आजपासून हॉटेल; लॉज, रेस्टॉरंटही सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 05:00 AM2020-07-09T05:00:00+5:302020-07-09T05:01:11+5:30
‘मिशन बिगेन फेज-५’मध्ये महापालिका क्षेत्र व जिल्हा ग्रामीणमध्ये कंटेनमेंट झोन वगळून व विलगीकरणासाठी वापरात असलेल्यांना जिल्हाधिकारी किंवा महापालिका आयुक्तांच्या पुढील आदेशापर्य$ंत त्यांचा वापर सुरू ठेवावा लागणार आहे. या सर्व ठिकाणी प्रवेशद्वारालगत तसेच पार्किंगच्या ठिकाणी गर्दी होणार नाही, यासाठी उपाययोजना कराव्या लागतील तसेच बसण्याच्या जागेची व्यवस्था करताना फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लॉकडाऊन शिथिलतेनंतरही बंद असलेले हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस व रेस्टॉरंट आदी निवासी सुविधा असलेल्या आस्थापना अटी-शर्तींच्या निकषात बुधवारपासून सुरू करण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. या ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठीची माहिती दर्शनी भागावर लावावी लागेल व निवासी असलेल्या अतिथींना रेस्टॉरंटमध्ये भोजनाची सुविधा राहणार आहे.
‘मिशन बिगेन फेज-५’मध्ये महापालिका क्षेत्र व जिल्हा ग्रामीणमध्ये कंटेनमेंट झोन वगळून व विलगीकरणासाठी वापरात असलेल्यांना जिल्हाधिकारी किंवा महापालिका आयुक्तांच्या पुढील आदेशापर्य$ंत त्यांचा वापर सुरू ठेवावा लागणार आहे. या सर्व ठिकाणी प्रवेशद्वारालगत तसेच पार्किंगच्या ठिकाणी गर्दी होणार नाही, यासाठी उपाययोजना कराव्या लागतील तसेच बसण्याच्या जागेची व्यवस्था करताना फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. प्रवेशाच्या ठिकाणी हँडवॉश, सॅनिटायझर, थर्मल स्क्रिनिंग तसेच रिसेप्शन सेंटरच्या ठिकाणी संरक्षणात्मक काचेचा वापर करावा लागणार आहे. या सर्व ठिकाणी स्पर्र्श होणार नाही अशा डिजीटल पेमेंट, ई-वॉलेटचा वापर करावा लागणार आहे. एसी २४ ते ३० अंश तापमानात राहील, याची दक्षता घ्यावी लागणार आहे.
निवासी अतिथींनाच भोजनाची सुविधा
भोजनाच्यावेळी अतिथी एकत्र नको
अतिथींच्या बैठक व्यवस्थेमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन हवे. भोजनाच्या वेळी ते एकत्र नको. जे अतिथी निवासी असतील, त्यांनाच जेवणाची सुविधा राहील, इतरांना नाही. गेमिंग आर्केड, लहान मुलांच्या खेळण्याची जागा, जलतरण तलाव, व्यायामशाळा बंद राहतील, असे आदेशात नमूद आहे.
फक्त निरोगी व्यक्तींनाच प्रवेश
या ठिकाणी फक्त निरोगी व्यक्तीं व जे चेहऱ्यावर मास्क परिधान करतील, अशा मोजक्या व्यक्तींनाच प्रवेश देण्यात यावा. निवासी राहणाऱ्या व्यक्तींचा प्रवास तपशील, वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य आहे व या सर्वांना आरोग्य सेतु अॅपचा वापर बंधनकारक व रूम सर्व्हिसचा कमीत कमी वापर करावा लागणार आहे.
आजारी झाल्यास त्वरित विलगीकरण
या ठिकाणी कोणी आजारी व्यक्ती असल्यास त्यांचे तात्काळ विलगीकरण करून त्यांच्याकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी लागणार आहे. कुणालाही कोरोनासदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या आरोग्य यंत्रणेशी संपर्क करून संपूर्ण परिसर निर्जंतुक करावा लागेल.