हॉटेल व्यावसायीकांनी आमदारांची घेतली भेट, मानले आभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:17 AM2021-08-14T04:17:12+5:302021-08-14T04:17:12+5:30
अमरावती : राज्यात बार, हॉटेल व रेस्टाॅरेंटच्या व्यवसायाला रात्री १० वाजेपर्यंत परवानगी राहणार असल्याचा निर्णय नुकताच ...
अमरावती : राज्यात बार, हॉटेल व रेस्टाॅरेंटच्या व्यवसायाला रात्री १० वाजेपर्यंत परवानगी राहणार असल्याचा निर्णय नुकताच शासनाने जारी केला आहे. यासंदर्भात आमदार सुलभा खोडके यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्याने हॉटेल व्यावसायिक आणि त्यावर अवलंबून असलेल्या कामगार वर्गाला दिलासा मिळाला आहे. यासंदर्भातील निवेदन व आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग दर्शवून खोडके दाम्पत्याने शासनाकडे मागणी रेटून धरीत निकाली काढल्याबद्दल येथील रेस्टॉरंट अँड लॉजिंग असोसिएशन व वाईन-बार असोसिएशनच्यावतीने आ. सुलभा खोडके यांची भेट घेतली आणि आभार मानले.
हॉटेल अँड लॉजिंग व्यवसायाचे अर्थचक्र पूर्वपदावर आणण्यासाठी बार, रेस्टाॅरेंट व हॉटेल व्यवसाय रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात यावी व या घटनांना दिलासा देणारा निर्णय जाहीर करावा अशी विनंतीपूर्वक मागणी विधीमंडळ समन्वयक संजय खोडके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत निवेदन सादर केले होते. त्याअनुषंगाने रात्री ११ पर्यंत परवानगी मिळाली आहे. यावेळी रेस्टॉरेंट अँड लॉजिंग असोसिएशनच्यावतीने आमदार सुलभा खोडके, संजय खोडके यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले. रवींद्रसिंग सलुजा, सारंग राऊत, मनोज जयस्वाल, आबिद हुसेन, अमित कुकरेजा, समीर देशमुख, सचिन जयस्वाल, अखिलेश राठी, शक्ती राठोड, पीयूष राठी, चिराग दोशी, गजानन राजगुरे, सुरेश चांदवाणी, नितीन देशमुख, शशी रत्नानी, जस्सी नंदा, अक्षय ढोके, सुमित शर्मा, माजी नगरसेवक लकी नंदा, गुड्डू धर्माळे, गजाजन राजगुरे, अखिल चांडक, उदय बूब, सरबजित सलुजा, समीर कुबडे आदी उपस्थित होते.