हॉटेल व्यावसायिकांचा मुकमोर्चा धडकला जिल्हाकचेरीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:14 AM2021-07-31T04:14:15+5:302021-07-31T04:14:15+5:30
लक्षवेध : वेळ वाढवून देण्याची मागणी अमरावती : शहरातील रेस्टॉरेंट, हॉटेल, लाजिंग उघडण्याची वेळ वाढवून देण्यात यावी, या प्रमुख ...
लक्षवेध : वेळ वाढवून देण्याची मागणी
अमरावती : शहरातील रेस्टॉरेंट, हॉटेल, लाजिंग उघडण्याची वेळ वाढवून देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी इर्विन चौक ते जिल्हा कचेरीपर्यंत मूकमोर्चा हॉटेल व्यावसायिकांनी काढला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना हॉटेल, रेस्टॉरेंट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन सोपविले. मोर्चात हॉटेल चालक व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कोरोना विषाणूचा संसर्ग लक्षात घेता बाजारपेठ सांयकाळी ४ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, हॉटेल येणारे ग्राहकांची वर्दळ ही नेमकी सांयकाळी जास्त आहे. परंतु ४ वाजता नंतर हॉटेल, रेस्टॉरेंट उघडे ठेवण्यास मनाई आहे. परिणामी हॉटेल व्यवसाय ठप्प पडला आहे. हॉटेल उघडण्यास कमी अवधी असल्याने हॉटेल व्यावसायिकांचा खर्चही निघणे कठीण झाला आहे. याशिवाय हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्याही उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट झाला आहे. अनेक कामगार हॉटेलमधील कामातून मिळणाऱ्या मिळकतीतून उदरनिर्वाह चालवितात. परंतु व्यवसायच ठप्प झाल्याने हॉटेल व रेस्टाॅरेंट व्यायवसायिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरेंटची वेळ रात्री ११ वाजेपर्यंत वाढविण्याची मागणी हॉटेल व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदनाव्दारे केली. यावेळी हॉटेल रेस्टोरेंट असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र सिंग सलुजा, सचिव सारंग राऊत, मनोज जायसवाल, आबिद हुसेन, अतिम कुरेजा, समीर देशमुख, सचिन जायस्वाल, नितीन कदम, सागर देशमुख आदी व्यावसायिकांची उपस्थिती होती.