धामणगावात पावणेपाच तासांचे भारनियमन
By Admin | Published: June 4, 2016 12:08 AM2016-06-04T00:08:49+5:302016-06-04T00:08:49+5:30
मागील दोन वर्षांपासून शहरात नसलेले भारनियमन यंदा तब्बल पावणेपाच तास शहरवासीयांच्या नशिबी आले आहेत़
शहरवासी त्रस्त : दररोज कुठे ना कुठे तांत्रिक बिघाड
धामणगाव रेल्वे : मागील दोन वर्षांपासून शहरात नसलेले भारनियमन यंदा तब्बल पावणेपाच तास शहरवासीयांच्या नशिबी आले आहेत़ दररोज कुठे ना कुठे तांत्रिक बिघाड होत असल्याने वीज मंडळाविरूद्ध रोष व्यक्त होत आहे़
धामणगावात अधिक वीज देयकांची वसुली होत असल्यामुळे गत दोन वर्षांत भारनियमन झाले नाही. मात्र यावर्षी आकस्मिक म्हणून 'क' ग्रुपमध्ये असलेल्या या शहराला भारनियमनाचा मोठा फटका बसत आहे़ सकाळी अडीच तास म्हणजे ७ ते ९़३० तर दुपारी सव्वादोन तास विशेषत: २़४५ ते ५ वाजेपर्यंत आकस्मिक भारनियमन करण्यात येते़ नारगावंडीत
अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा
नारगावंडीत येथील वीज मंडळाच्या उपके द्रांतर्गत सोनेगाव खर्डा, सावळा, सालणापूर, आजनगाव या गावांसह अनेक गावे येतात़
नारगावंडी येथील कनिष्ठ अभियंता हे शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याऐवजी अर्वाच्छ शब्दांत शिवीगाळ करीत असल्याच्या तक्रारी या भागातील शेतकऱ्यांनी ऊर्जा मंत्र्यांकडे केल्या आहेत़ ग्रामस्थांना व्यवस्थितपणे वीजपुरवठा करणे वीज मंडळाचे काम असून नारगावंडी येथील अधिकारीच ग्रामस्थांच्या जीवावर उठले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शेतकऱ्यांचा अधिक रोष वाढण्यापूर्वी नारगावंडी येथील अधिकाऱ्याची बदली करण्याची मागणी शासनाकडे तब्बल ३०० शेतकऱ्यांनी लेखी तक्रारीत केली आहे़ (तालुका प्रतिनिधी)
गंजलेले खांब अन् तुटलेल्या तारा
धामणगाव शहरवासीयांना नियमीत वीज देणारे वीज मंडळ आता शहरवासीयांची परीक्षा घेत आहे़ आकस्मीक भारनियमन शहरवासीयांना एकीकडे सहन करावे लागत असतांना दुसरीकडे अचानकपणे थोड्या प्रमाणात हवा सुटली तरी तारा तुटण्याचे प्रकार अधीक वाढले आहे़ सकाळी एखांद्या डिपीवरील विद्युत पुरवठा सुरळीत केला तरी सायंकाळी या डिपीवरील पुरवठा बंद होतो मागील सात दिवसापासून सातत्याने घडणाऱ्या प्रकारामुळे वीज मंडळाविरूध्द राजकीय पक्षांनी रोष व्यक्त केला आहे़ वीज मंडळ कनिष्ठ अभियंत्याचा मोबाईल स्विच आॅफ दाखवतो.
ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये रोष
धामणगाव तालुक्यात २१ फीडर असून कृषी पंपाच्या फीडर वर केवळ आठवड्यातील आठ तास विज देण्यात येते़ सध्या शेतात भाजीपाला व अन्य पीके असतांना दिवसभर वीज बंद आणी रात्रीला विज असल्याने शेतकऱ्यांना अंधारातच ओलीत करण्याची पाळी आली आहे़