पुन्हा पाचच्या आत घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:09 AM2021-06-27T04:09:54+5:302021-06-27T04:09:54+5:30
अमरावती : ‘डेल्टा प्लस व्हेरीएंट’च्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात सोमवारपासून पुन्हा संचारबंदीचे निर्बंध वाढविण्यात आलेले आहे. यामध्ये जीवनावश्यक ...
अमरावती : ‘डेल्टा प्लस व्हेरीएंट’च्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात सोमवारपासून पुन्हा संचारबंदीचे निर्बंध वाढविण्यात आलेले आहे. यामध्ये जीवनावश्यक दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यत नियमित सुरू राहतील. याशिवाय बिगर जीवनावश्यक दुकाने सोमवार ते शुक्रवार विहीत वेळेत सुरू व शनिवार, रविवारी बंद राहणार आहे. रोज सायंकाळी पाचनंतर संचारबंदी लागू राहणार आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शनिवारी जारी केले.
बॉक्स
या सेवा नियमित सुरू
सर्व प्रकारची जीवनावश्यक व अत्यावश्यक दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत नियमित सुरू राहतील. यामध्ये किराणा, भाजीपाला, फळ, डेअरी, बेकरी, मिठाई, खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने, कृषी सेवा केंद्रे, कृषी प्रक्रिया उद्योग, कृषीसंबंधी कामे, बांधकामे व रेशन दुकाने नियमित आठवडाभर नियमित सुरू राहतील.
बॉक्स
बिगर जीवनावश्यक शनिवार, रविवारी बंद
बिगर जीवनावश्यक दुकाने सोमवार ते शुक्रवार नियमित सुरू व शनिवार व रविवारी बंद राहतील. मद्यागृहे, दारू दुकाने सोमवार ते शुक्रवार नियमित सुरू तसेच शनिवार व रविवारला सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत घरपोच सेवा देता येईल. हॉटेल, रेस्टाॅरंट, बार, शिवभोजन थाळी सोमवार ते शुक्रवार नियमित पण ५० टक्के आसन क्षमतेसह तसेच दुपारी ४ ते ८ घरपोच सेवा, शनिवारी व रविवारी सकाळी ७ ते रात्री ८ घरपोच सेवा, हॉटेल, लॉजिंगमध्ये क्षमतेच्या ३३ टक्के क्षमतेने निवास करता येईल.
बॉक्स
क्रीडांगणे सकाळी ९ पर्यंत
क्रीडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने, बगीचे मॉर्निंग वॉक, दररोज सकाळी ५ ते ९ पर्यंतच परवानगी आहे. सर्व खासगी आस्थापना, कार्यालये सोमवार ते शुक्रवार दुपारी चारपर्यंत मुभा आहे. याशिवाय खासगी बँका, विमा कार्यालये याला अपवाद आहे. ही पूर्ण क्षमतेने सुरू राहतील. शासकीय कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील.
बॉक्स
लग्न समारंभात ५० व्यक्तींनाच परवानगी
लग्न समारंभात कॅटरिंग, बँडपथक, वर-वधुसह तसेच सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम ५० लोकांच्या उपस्थितीत साजरा करता येणार आहे. याकरिता स्थानिक प्राधिकरणाची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. यामध्ये संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा लागेल. लग्न समारंभाकरिता सायंकाळी ५ पर्यंतच परवानगी आहे.
बॉक्स
क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीत सभा बैठकी
सभा, बैठकी, सहकारी संस्थेच्या आमसभा क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीत तसेच शक्य असल्यास ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात. बंधकामात फक्त साईट असणारे मजूर अथवा बाहेरील मजुरांच्या बाबतीत दुपारी ४ पर्यंत मुभा आहे. जीम, व्यायामशाळा, सलून, ब्युटी पार्लर, एकूण क्षमतेच्या ५० टक्के पूर्व नोंदणीसह राहील.
बॉक्स
पूर्ण आसन क्षमतेने वाहतुकीस परवानगी
या कालावधीत पूर्ण आसन क्षमतेने वाहतुकीस परवानगी राहील. वातानुकुलीत सेवेस परवानगी नाही. माल वाहतुकीत अधिकतम तीन लोकांना परवानगी आहे. नियमितपणे वाहतूक करता येणार आहे. आंतर जिल्हा वाहतूक नियमितपणे पूर्ण वेळ, जर प्रवासी लेव्हल पाच असलेल्या जिल्ह्यातून येत असल्यास ई-पास आवश्यक आहे.
बॉक्स
अन्यथा दंडात्मक कारवाई
सार्वजनिक ठिकाणी मास्क नसल्यास ७५० रुपये दंड, फिजिकल डिस्टन्स नसल्यास ३५ हजार व मंगल कार्यालयांमध्ये लग्न समारंभाकरिता ५० पेक्षा अधिक उपस्थिती आढळून आल्यास ५० हजार रुपये दंडाची आकारणी करण्यात येणार आहे. पहिल्यांदा आढळल्यास दंड व दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.