तिवसा रुग्णालय रुग्णांनी हाउसफुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:10 AM2021-07-23T04:10:01+5:302021-07-23T04:10:01+5:30
तिवसा रुग्णालय रुग्णांनी हाउसफुल डेंग्यूसदृश आजार; व्हायरल फिव्हर तापाने नागरिक फणफणतायत तिवसा/सूरज दाहाट तिवसा तालुक्यातील डेंग्यूसदृश आजार व व्हायरल ...
तिवसा रुग्णालय रुग्णांनी हाउसफुल
डेंग्यूसदृश आजार; व्हायरल फिव्हर तापाने नागरिक
फणफणतायत
तिवसा/सूरज दाहाट
तिवसा तालुक्यातील डेंग्यूसदृश आजार व व्हायरल फिव्हर आजाराने थैमान घातले असून तिवसा उपजिल्हा रुग्णालय रुग्णांनी हाऊसफुल झाले आहेत, तिवसा शहर व आनंनदवाडीत दूषित पाणी पुरवठा होत असल्याने आजाराची लागण होत आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या कमी झाली असली तरी ग्रामीण भागात विविध आजार वाढत आहे. अस्वच्छता सांडपाणी नाल्यातील घाण त्यामुळे मच्छर वाढ होत असल्यामुळे सर्दी खोकला ताप यातून मलेरिया व डेंग्यू असे आजार नागरिकांना होत आहे, पावसाळा आला की सोबत रोग घेऊन येतो, गेल्या महिन्यापासून तिवसा शहरात डेंग्यूचे रुग्ण आढळून आहे आहेत. लहान मुलापासून तर मोठ्यापर्यंत सर्वांनाच आजाराचे लक्षण असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यामुळे तिवसा रुग्णालयातील सर्व खाटा डेंग्यूच्या रुग्णांनी हाउसफुल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, तिवसा व आनंदवाडीत गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत आहे, त्यामुळे या दूषित पाण्यामुळे हे आजार होत आहे.
कोट
डेंग्यूसदृश आजार म्हणावा लागेल. रुग्णांचे नमुने हे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून रुग्णांवर उपचार सुरू आहे. नागरिकांनी पाणी गरम करून प्यावे.
- गौरव विधळे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, तिवसा उपजिल्हा रुग्णालय
-------
आमच्या भागात नियमितपणे पाणी पुरवठा होत नाही. होतो तर तेही दूषित पाणी पुरवठा होतो, त्यामुळे स्वच्छ पाणी आम्हाला मिळाले पाहिजे, आमच्या भागात डेंग्यूचे रुग्ण आहेत. माझी मुलगी आजारी आहे.
- सर्फराज पठाण, नातेवाईक