दहा लाखांचा भेसळयुक्त खवा जप्त कर्नाटकातून अमरावतीत आला कसा?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 11:00 AM2024-10-18T11:00:21+5:302024-10-18T11:01:33+5:30

अन्न व औषधी प्रशासनाची कार्यवाही : ३५०० किलो खवा ताब्यात; नमुने प्रयोगशाळेत

How did the seizure of adulterated khawa worth ten lakhs come from Karnataka to Amravati? | दहा लाखांचा भेसळयुक्त खवा जप्त कर्नाटकातून अमरावतीत आला कसा?

How did the seizure of adulterated khawa worth ten lakhs come from Karnataka to Amravati?

मनीष तसरे 
अमरावती :
सणासुदीच्या काळात लोकमत न्यूज नेटवर्क खाद्यपदार्थांमधील भेसळीचे प्रमाण वाढते. त्यामुळे अन्न व औषधी प्रशासन अधिक सतर्कतेने याकडे लक्ष ठेवून असते. या पार्श्वभूमीवर, दिवाळीच्या तोंडावर कर्नाटकातून अमरावतीत आलेला ३५०० किलो भेसळयुक्त खवा ज्याची किंमत अंदाजे दहा लाख रुपये आहे. तो अन्न व औषधी प्रशासनाने छापा टाकून जप्त केला. 


अन्न व औषधी प्रशासन या प्रकरणी कारवाई करत असून नागरिकांनी याबाबत सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. कर्नाटक व गुजरात राज्यांतून मोठ्या प्रमाणावर अवैध व भेसळयुक्त अन्नपदार्थ शहरात पोहोचल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी गजानन गोरे यांना मिळताच गुरुवारी अन्न व औषधी प्रशासनाने शहरातील जुना बायपास मार्गावरील भागातील चैतन्य कॉलनीतील दिनेश रामराव नागपुरे यांच्या गोदामावर छापा टाकून सहआयुक्त रामभाऊ चौव्हाण यांच्या मार्गदर्शनात कारवाई केली. यावेळी अन्न सुरक्षा अधिकारी संदीप सूर्यवंशी, जिल्हा दुग्ध विभागाचे विनोद पाठक, पशुधन विकास अधिकारी तुषार गावंडे, तसेच फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी उपस्थित होते. 


सणासुदीच्या काळात मिठाईमध्ये भेसळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भेसळयुक्त मिठाईची सातत्याने तपासणी करून पदार्थांबाबत अन्न प्रशासनाकडून सातत्याने कार्यवाही करण्यात येते. तरी नागरिकांनी मिठाई खरेदी करताना काळजी बाळगावी. तक्रार असल्यास तत्काळ अन्न व औषधी प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन अन्न प्रशासनाने प्रभारी सहआयुक्त रामभाऊ चौव्हान यांनी केले. 


कर्नाटकातून थेट अमरावतीत नकली खवा 
सध्या सणासुदीचे दिवस असल्याने मिठाईमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाहेरील राज्यांतून भेसळ पदार्थ अमरावतीत पोहोचविण्याकरिता विक्रेते नवनवीन शक्कल लढवितात. मागील वर्षी खासगी बसद्वारे शहरात येणारा खवा पकडला गेल्याचे पाहून यावर्षी विक्रेत्यांनी थेट गोडावूनपर्यंत चारचाकीने खवा मागविला.


"अमरावतीत भेसळयुक्त खवा पोहोचल्याची माहिती गुरुवारी सकाळीच मिळाली. त्या अनुषंगाने सापळा रचून जुना बायपास मार्गावरील माणिकर्णानगरात। दिनेश नागपुरे यांच्या गोदामावर छापा टाकला. तेथे ३५०० किलो बनावट खवा कर्नाटक राज्यातून अमरावतीत विक्री करण्याकरिता आणलेला आढळून आला. या खव्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले."
- गजानन गोरे, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न प्रशासन विभाग

Web Title: How did the seizure of adulterated khawa worth ten lakhs come from Karnataka to Amravati?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.