प्रकल्प गाठताहेत तळ कसे वाहणार नळ ?

By admin | Published: April 2, 2015 12:35 AM2015-04-02T00:35:06+5:302015-04-02T00:35:06+5:30

शेतकऱ्यांसह अन्य घटकांना अस्वस्थ करणाऱ्या अवकाळी पावसाच्या कळा आणि गारपीट अलीकडे नित्याची बाब झाली असली ...

How does the tunnel flow through the project? | प्रकल्प गाठताहेत तळ कसे वाहणार नळ ?

प्रकल्प गाठताहेत तळ कसे वाहणार नळ ?

Next

अमरावती : शेतकऱ्यांसह अन्य घटकांना अस्वस्थ करणाऱ्या अवकाळी पावसाच्या कळा आणि गारपीट अलीकडे नित्याची बाब झाली असली तरी अमरावती विभागात जलप्रकल्पातील जलसाठा निम्म्यापेक्षा कमी होत असल्याने उन्हाळा किती तीव्र असेल ते सांगत आहेत. विभाग तील ४४९ प्रकल्पांत आता केवळ ३२ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता वाढली आहे. सध्या २२ गावे वाड्यांना टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. आगामी काळात तहानलेल्या गाव वाड्यांची संख्या वाढणार आहे. दुसरीकडे उपलब्ध साठ्यातून काळजीपूर्वक पाणी पुरवठयाचे प्रशासनापुढे आवाहन आहे.
विभागातील अमरावती अकोला, वाशिम, यवतमाळ, आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यात मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्प मिळवून सुमारे ४४९ प्रकल्प आहेत. यामध्ये अमरावती विभागातील नऊ मोठया प्रकल्पांत ९४१.८२ द.ल.घ.मी. उपयुक्त पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी ३२.२८ इतकी आहे. अमरावती जिल्ह्यात एका मोठ्या प्रकल्पामंध्ये २०८.७१ या प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठाच शिल्लक आहे. याची टक्केवारी ३७ एवढी आहे.अमरावती जिल्हयात मोठे, मध्यम व लघु असे एकूण ७६ प्रकल्प आहेत. यामध्ये मंगळवार पर्यत एकूण चार मध्यम प्रकल्पात १११.६९ द.ल.घ.मी पाणीसाठा आहे. याची टक्केवारी ६९.२६ एवढी आहे तर ७१ लघु प्रकल्पात एकृण ५५.६८ द.ल.घ.मी पाणी साठा शिल्लक आहे. जिल्हाभरातील सर्व लहान-मोठ्या प्रकल्पात एकूण ३७६ .०८ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. याची टक्केवारी ४३.४२ आहे. अमरावती व विभागातील पाच जिल्ह्यातील प्रकल्पात आजघडीला ९४१.८२ एवढाच पाणी साठा शिल्लक असून याची टक्केवारी केवळ ३२.२८ एवढीच आहे. सध्या उन्हाळ्याला जेमतेम सुरूवात झाली असून मार्च महिना संपला आहे. तरीही उन्हाळ्यातील तीन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई ही येणाऱ्या काही दिवसात गंभीर होण्याची चिन्हे सध्याच्या प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठ्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे यंदा पाणी टंचाईची गळद छाया जिल्ह्यात पडणार हे निश्चित आहे. शहरासह जिल्हयातील अनेक गावांना जिल्ह्यातील विविध सिंचन प्रकल्पातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो.
याशिवाय शेतीलाही सिंचन प्रकल्पातून पाणी उपलब्ध करून दिले जाते. परंतु शेतीचा विषय सध्या सोडल्यास नागरिकांना प्रकल्पातून होणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारेच प्रकल्प तळ गाठत असल्याने भविष्यात पाण्याचे नळ कसे वाहणार ही बाब सर्वासाठी चिंतेची ठरणार आहे.
प्रकल्पातून केवळ प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला पाण्याचा पुरवठा होता. ग्रामिण भागातील बऱ्याच गावाना स्थानिक पाणी स्रोतमधून पाणी पुरवठ्याची व्यवस्था आहे. त्यामुळे विहीर व बोरवेल्सव्दारे पाणी पुरवठा होत असल्याने सध्या तरी पाणी टंचाईची समस्या नाही. ज्या ठिकाणी समस्या निर्माण झाली तर ती हाताळण्यास पाणी पुरवठा विभाग सज्ज आहे.
संजय येवले
उपअभियंता
पाणी पुरवठा विभाग जि.प.
प्रकल्पातील पाण्याचा साठा कमी होत असला तरी याचा संभाव्य परिणाम प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला होऊ शकतो; मात्र तशी वेळ यणार नाही. ग्रामीण भागात सध्या बऱ्याच गावामध्ये स्वतंत्र पाणी पुरवठ्याचे सोर्स आहेत. त्यामुळे पाणी टंचाईची शक्यता फारशी भासणार नाही
आनंद दासवत
उपअभियंता
पाणी पुरवठा विभाग, अमरावती

Web Title: How does the tunnel flow through the project?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.