शासनाच्या वसुलीसाठी चलन वैध कसे ?

By admin | Published: November 12, 2016 12:14 AM2016-11-12T00:14:58+5:302016-11-12T00:14:58+5:30

महापालिकेच्या कर वसुलीसाठी शासनाने जुने चलन अर्थात् ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा स्वीकारल्या.

How to get money for government recovering? | शासनाच्या वसुलीसाठी चलन वैध कसे ?

शासनाच्या वसुलीसाठी चलन वैध कसे ?

Next

अमरावती : महापालिकेच्या कर वसुलीसाठी शासनाने जुने चलन अर्थात् ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा स्वीकारल्या. जे चलन शासनाने बाद ठरविले तेच चलन स्वत:ची वसुली करण्यासाठी मात्र वैध केले. शासनाचे हे फसवेगिरीचेच धोरण नाही काय, असा सवाल प्रदेश काँग्रेसच्या महासचिव कांचनमाला गावंडे यांनी उपस्थित केला आहे. सामान्यांचे दैनंदिन व्यवहार ठप्प पाडायचे आणि स्वत:साठी रस्ते मोकळे करायचे, हेच काय सरकारचे कर्तव्य? सामान्यांना जगणे कठीण झाले आहे. मजुरांना मजुरी द्यायची कशी? औषधी आणयची कशी? शैक्षणिक शुल्क द्यायचे-स्वीकारायचे कसे? खासगी कर्मचाऱ्यांचे वेतन करायचे कसे, या प्रश्नांवर सरकारने उपाय द्यावेत, अशीही मागणी त्यांनी केली. (प्रतिनिधी)

Web Title: How to get money for government recovering?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.