किती शिक्षकांनी शाळेत जायचे रे भाऊ ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:09 AM2021-06-22T04:09:53+5:302021-06-22T04:09:53+5:30
शिक्षण संचालकांच्या पत्रानुसार कार्यवाही व्हावी; प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांची मागणी अमरावती : राज्यात शिक्षण संचालकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक, माध्यमिक ...
शिक्षण संचालकांच्या पत्रानुसार कार्यवाही व्हावी; प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांची मागणी
अमरावती : राज्यात शिक्षण संचालकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या उपस्थितीबाबतच्या सूचना लेखी आदेशाव्दारे शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मात्र, त्यावर शिक्षणाधिकाऱ्याकडून सूचना प्राप्त नसल्याने किती शिक्षकांनी शाळेत जायचे रे भाऊ, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिक्षण संचालकांच्या पत्रानुसार कार्यवाही व्हावी, अशी मागणी होत आहे.
कोरोना कमी झाला नसल्याने अनलॉक चौथ्या टप्प्यात जिल्हा आहे. त्यामुळे शाळा तूर्त ऑनलाईन पध्दतीने भरणार आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याबाबतच्या सूचना माध्यमिक, प्राथमिक शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. त्यानुसार शाळांनी तयारी केली आहे. समूह अध्यापनांतर्गत विद्यार्थ्यांचे गट तयार करून त्यांना शिक्षण देण्याचा पर्यायही शिक्षण विभागाने सुचविला आहे. ज्या शाळांमध्ये कोविड सेंटर आहेत तेथील शिक्षकांनी घरातून ऑनलाईन शिक्षण द्यावे, अशी सूचना शिक्षण विभागाने केली आहे. मात्र, राज्याच्या शिक्षण संचालकांनी शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत १४ जूनच्या पत्राव्दारे काही सूचना शिक्षण उपसंचालकांना केल्या आहेत. त्यात शिक्षकांच्या उपस्थितीची टक्केवारी निश्चित केली आहे.
बॉक्स
संचालकांचे पत्र काय?
शिक्षण संचालकांच्या पत्रात इयत्ता पहिली ते नवनी, अकरावीच्या ५० टक्के आणि दहावी बारावीच्या १०० टक्के शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य राहील. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती १०० टक्के राहील.
प्राथमिक, माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य यांनी १०० टक्के उपस्थिती राहील असे म्हटले आहे.
बॉक्स
जिल्हा परिषदेचे पत्र काय
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांती विद्यार्थ्याना शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षण द्यावे
मात्र, शाळेतील उपस्थिती इयत्ता पहिली ते नववी ५० टक्के आणि इयत्ता दहावी आणि बारावीच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती १०० टक्के राहणार आहे.
बॉक्स
जिल्ह्यातील शाळा - २८९८
जिल्हा परिषदेच्या शाळा-१५८३
विनाअनुदानित शाळा -७४४
अनुदानित शाळा-७७९
शासकीय शाळा -३३
मनपा शाळा -६३
नगरपरिषद शाळा
बॉक्स
शिक्षक -१८९७४
शिक्षकेतर -१५००
कोट
शैक्षणिक सत्राची सुरुवात आणि ऑनलाईन शिक्षणाबाबत प्राथमिक शाळांना सूचना दिल्या आहेत. प्राथमिक शिक्षकही कोरोना डयुटीवर आहेत. सीईओंच्या मार्गदर्शनात पहिली ते नववीपर्यंत ५० टक्के आणि १० ते १२ वीच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थिती १०० टक्के राहणार आहे.
- एजाज खान,
शिक्षणाधिकारी प्राथमिक
कोट
शासनाने याबाबतचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देऊन त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना समन्वय साधून मर्यादित उपस्थितीत शाळा सुरू शाळा सुरू करण्यास प्राधान्य द्यावे. ऑनलाईन शिक्षण शंभर टक्के विद्यार्थ्यांपर्यंत पोहचू शकत नाही. जिल्ह्याची कोविड १९ ची परिस्थिती पाहता मर्यादित उपस्थितीत शाळा सुरू होऊ शकतात. शाळा प्रत्यक्ष सुरू नसल्यास उपस्थितीबाबत शिक्षण संचालकांच्या पत्राची अंमलबजावणी व्हावी.
- किरण पाटील,
उपाध्यक्ष
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ
कोट
२८ जूनपासून विदर्भातील शाळा सुरू होत आहे. किती टक्के शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहावे, याबाबतचे लेखी आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना द्यावे. शाळा सुरू करण्याबाबत विद्यार्थी व कोविडची स्थिती पाहता योग्य निर्णय घ्यावा.
- गोकुलदास राऊत,
जिल्हाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक समिती अमरावती