किती पीडित महिलांना मिळाले तीन लाख ? जिल्ह्यात ७३ महिलांना मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 12:52 PM2024-10-02T12:52:23+5:302024-10-02T12:53:09+5:30
Amravati : पीडित महिलांना मिळते ३ लाख रुपये शासन मदत
अमरावती : लैंगिक अत्याचार झालेल्या पीडितांना मनोधैर्य योजनेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. बलात्कार पीडित, लैंगिक अत्त्याचाराने पीडित बालक, अॅसिड हल्ल्याला बळी पडलेल्या पीडिता, जाळण्याचा प्रयत्न झालेली पीडिता यांना शासनाच्या जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून मदत केली जाते. जिल्ह्यात मागील आठ महिन्याच्या कालावधीत ७३ महिलांना १ कोटी ३१ लाख २८ हजाराची मदत दिली आहे.
मनोधैर्य योजना ?
अत्याचार पीडित महिलांना जगण्यासाठी बळ मिळावे, यासाठी २ ऑक्टोबर २०१३ रोजी शासनाने मनोधैर्य योजना कार्यान्वित केली आहे.
कोणाला मिळते सहाय?
सामूहिक अत्याचार, अॅसिड हल्ला, पोस्को घटनेतील पीडित, अत्याचारात मृत्यू झाल्यास १० लाख इतर पीडितांना ३ लाख मदत मिळते.
आठ महिन्यात ७३ महिलांना १.३१ कोटी रुपये
जिल्हा विधसेवा प्राधिकरण विभागाच्या वतीने जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांमध्ये ७३ अत्याचार पीडित महिलांचे प्रकरणे मंजूर करण्यात आले असून त्यांना १ कोटी ३१ लाख २८ हजार ७५० रुपये इतकी आर्थिक मदत झाल्याचे सांगण्यात आले.
सखी वन स्टॉपमध्ये समुपदेशन
अत्याचारानंतर जर पीडिता व तिच्या कुटुंबाचे मानसिक बळ देण्यासाठी वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून समुपदेशकाशी समन्वय साधून त्यांना मानिसक आधार दिला जातो.
"अत्याचार पीडितेसाठी मनोधैर्य योजना राबविण्यात येत आहे. यातून पीडितेला अर्थसहाय्य दिले जाते. आठ महिन्यात ७३ महिलांना अर्थसहाय्य करण्यात आले आहे."
- मंगला कांबळे, सचिव, जिल्हा विधिसेवा प्राधिकरण