किती ही लूट? भाजी मंडईत कोबीफूल १५ तर घराजवळ ६० रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:12 AM2021-07-30T04:12:45+5:302021-07-30T04:12:45+5:30

मागणीच्या तुलनेत स्थानिक क्षेत्रातील उत्पादन कमी पडत असल्याने अमरावती बाजार समितीच्या भाजी मंडईत दूरदुरून भाजीपाला, फळे विक्रीला येतात. मात्र, ...

How much loot? Cabbage at Rs 15 per kg in vegetable market and Rs 60 per kg near home | किती ही लूट? भाजी मंडईत कोबीफूल १५ तर घराजवळ ६० रुपये किलो

किती ही लूट? भाजी मंडईत कोबीफूल १५ तर घराजवळ ६० रुपये किलो

Next

मागणीच्या तुलनेत स्थानिक क्षेत्रातील उत्पादन कमी पडत असल्याने अमरावती बाजार समितीच्या भाजी मंडईत दूरदुरून भाजीपाला, फळे विक्रीला येतात. मात्र, पावसामुळे कुठे दरड कोसळल्याने वा रस्ते खरडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन फेऱ्याने वाहने आणावी लागत असल्याने डिझेलचा वाढता खर्च पाहता चढ्या दराने भाजीपाला विकला जात असला तरी चिल्लर विक्रेते त्याच्या चौपट दराने विक्री करीत असल्याने सामान्य ग्राहकांच्या खिशाला खार लागत असल्याच्या प्रतिक्रिया गृहिणींकडून उमटू लागल्या आहेत.

बॉक्स

पिकवतात शेतकरी जास्तीचा पेसा तिसऱ्याच्या हातात

शेतकरी राबराब राबून उन्ह -वारा सहन करीत जिवाचा आटापिटा करून भाजीपाला पिकवितो. सायंकाळी तो भरून पहाटे मंडईत आणतो. उत्पादन खर्चासह वाहतूक खर्च पाहता त्याला तोकडे उत्पन्न मिळतो. मात्र, मंडईतून ग्राहकांपर्यंत पोहचविण्याचा मोबदला त्यापेक्षा अधिक विक्रेता मिळवतो.

-

एवढा फरक कसा?

भाजीपाला मंडईत येतो तेव्हा त्याची बोली लावतो दलाल. खरेदी करतो अडत्या आणि ग्राहकांपर्यंत पोहचवितो चिल्लर विक्रेता, अशी ही साखळी निर्माण झाली आहे. मात्र, शेतकरी वगळता सर्वांना भाव ठरविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मंडईत पोहचलेल्या मालाची विक्री आपला नफा पाहून हे विक्रेते ठरवित असल्याने दरात इतका फरक दिसून येतो, असे दलालांचे म्हणणे आहे.

-

रुक्मिणीनगर हिरवी मिरची ८० रुपये किलो

भाजी मंडईत २० रुपये किलो शेतकऱ्यांकडून खरेदी होत असलेली हिरवी मिरची रुक्मिणीनगरात तब्बल ८० रुपये प्रतिकिलो विकली जात असल्याचे किरकोळ भाजीपाला विक्रेता नामदेव बडगे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

गृहिणींच्या प्रतिक्रिया

अर्धा किलो अन पावभर भाजीपाला खरेदीकरिता थेट भाजी मंडईत जाणे परवडत नसल्याने घराजवळ येणाऱ्या हातगाडीवर भाजीपाला खरेदी करावा लागतो. मात्र, चौपट भाव सांगण्यात येतात. नाइलाजाने तो खरेदी करावा लागतो.

- जयवंतीबाई आडे,

हमालपुरा

मंडईत येणाऱ्या भाजीपाल्याचे दर हे आवकनुसार दररोज बदलत असले तरी चिल्लर विक्रेता मात्र, चढ्या दरानेच विक्री करतात. इतके महाग म्हणताच, रोजच तर आपण भाजीपाला घेता. मग आजच का इतका महाग म्हणता, असे प्रत्युत्तरही देतात.

- मोनाली गुलालकरी

गांधीनगर

मंडईतून आणलेला भाजीपाला घरी साफ करावा लागतो. त्यातील खराब माल फेकावे लागतात. त्यामुळे ठोक दरात मिळालेल्या भावाने ग्राहकांच्या घरापर्यंत जाऊन विकल्यास आमची मजुरी निघेल का? घरखर्च चालेल एवढीच कमाई होत असल्याने आजही आहे त्याच स्थितीत जगत आहे.

- नामदेव बडगे,

भाजीविक्रेता

हा बघा दरातील फरक (प्रतिकिलो दर)

भाजीपाला ठोक दर चिल्लर दर

कांदा १८ ३०

बटाटा १४ ३०

लसूण ९० १६०

टोमॅटो २० ६०

वांगी १६ ४०

फूलकोबी २० ६०

पानकोबी २० ४०

पालक १५ ६०

मेथी ३५ ४०

कारले २२ ४०

बरबटी १५ ४०

ढेमसे २० ५०

सांभार ३० १२०

काकडी १५ ४०

बीट १८ ६०

हिरवी मिरची २५ ८०

सिमला मिरची २८ ४०

कोहळं १० ३०

भेंडी १५ ४०

गवार ३० ८०

गांजर २० ६०

Web Title: How much loot? Cabbage at Rs 15 per kg in vegetable market and Rs 60 per kg near home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.