गतिरोधक किती सुरक्षित ?

By admin | Published: February 23, 2016 12:04 AM2016-02-23T00:04:17+5:302016-02-23T00:04:17+5:30

शहरातील वाहनांची गर्दी आणि वाढलेले अपघातांवर काही अंशी नियंत्रण ठेवण्यासाठी गतिरोधकाची निर्मिती केली जाते.

How Safe is Speed ​​Break? | गतिरोधक किती सुरक्षित ?

गतिरोधक किती सुरक्षित ?

Next

असुरक्षिततेची भावना : आयआरसीचे नियम पायदळी
प्रदीप भाकरे अमरावती
शहरातील वाहनांची गर्दी आणि वाढलेले अपघातांवर काही अंशी नियंत्रण ठेवण्यासाठी गतिरोधकाची निर्मिती केली जाते. त्यामुळे ते अत्यावश्यक आहेत. पण, या गतिरोधकांमुळे नवीन संकट ओढवल्याचे चित्र सर्रास पाहायला मिळत आहे. परिणामी या गरजेच्या गतिरोधकांबाबत वाहन चालकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी गतिरोधक उभारले जातात. त्यासाठी इंडियन रोड काँग्रेसचे नियम आणि निकषही आहेत. मात्र शहरातील गतिरोधकांची अवस्था पाहता नियमांची प्रतारणा करीत अनेक ठिकाणी फक्त मागणी आली म्हणून गतिरोधक उभारल्याचे दिसून येते. शहरातील गतिरोधक वाहनांची गती नियंत्रित ठेवण्यासाठी उभारलेत की ‘मागणी तसा पुरवठा’ या तत्वावर त्यांची निर्मिती केली आहे. असा प्रश्न रस्त्यांवरील गतिरोधकांवरून जाताना पडतो.

गतिरोधकाने आजार बळावले
अमरावती : शहरात उभारलेले गतिरोधक एक सारखे नाहीत. गतिरोधकांच्या नावाखाली काही ठिकाणी उभारलेल्या टेकांड्यामुळे नागरिकांची शारीरिक, तसेच वाहनांचीही क्षति होत आहे. यातून गतिरोधक उभारतांना यंत्रणा कोणत्या नियमाची अंमलबजावणी क रते, असाच प्रश्न निर्माण झाला आहे.
पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी व वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी गतिरोधक उभारले जातात.मात्र प्रशासनाने इंडियन रोड कांग्रेसचे नियम व उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे डोळेझाक करत अनेक ठिकाणी गतिरोधक उभारले जातत. पादचाऱ्यांना रस्ता ओलाडण्यासाठीच्या उंचवट्यांना शहरातील वाहनचालकांना समोरे जावे लागते. त्यावर पडलेले खड्डे व उखडल्ले पेव्हिंग बॉक्स यामुळे वाहन घसरण्याच्या घटनाही घहत आहेत. डांबराच्या पातळ पट्ट्या (रंबल्ड स्ट्रिप्स) वापरुन वाहतूक उंचावत जाणारा व शिखरावर सपाट असलेला ऊंचवटा तयार करुन गतिरोधकाची निर्मिती झाली पाहिजे. हा आयआरटींचा नियमही पासलेला दिसत नाही. परिणामी या गरजेच्या गतिरोधकांबद्दल वहन चालकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे.
शहरातील वाहतूक होईल स्मार्ट
शहरातील अनेक मार्गासह महामार्गाचीही हीच परिस्थिती आहे.त्यामुळे अमरावती शहर स्मार्टसिटीचे नियोजन करतांना चांगले रस्ते हवेत. याबाबतचा निर्णय तज्ञांच्या सल्लयावरुन केल्यावरच झाला तर शहरातील वाहतूक स्मार्ट व सुरक्षित होईल.

स्पीडब्रेकरमुळे नागरिकांना पाठीचा, मणक्याचा आजार बळावल्याची अनेक उदाहरणे आहेत. गतिरोधकांची ऊंची कमी-अधिक असल्यामुळे वाहनचालकांना अनेक प्रकारच्या आजाराला सामोरे जावे लागते.
- प्रिया चौधरी,
जनरल फिजियशन

Web Title: How Safe is Speed ​​Break?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.