सर्व सामान्यांची एसटी किती सुरक्षित? ४५० पैकी २८ बसचालकांकडून वर्षभरात अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:22 AM2021-02-06T04:22:27+5:302021-02-06T04:22:27+5:30
अमरावती : रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने घेतलेल्या आढाव्यात, जिल्ह्यात २०२० या वर्षभरात एसटी अपघाताच्या २८ घटना घडल्या. यापैकी १८ ...
अमरावती : रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने घेतलेल्या आढाव्यात, जिल्ह्यात २०२० या वर्षभरात एसटी अपघाताच्या २८ घटना घडल्या. यापैकी १८ अपघात किरकोळ, तर आठ गंभीर प्रकाराचे आहेत. दोन अत्यंत प्राणांतिक अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू झाला. तथापि, रस्त्यावर वाढलेली वाहने व बेफाम वाहतुकीच्या तुलनेच एसटीने प्रवास हाच सुरक्षित प्रवास असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
जिल्हाभरात ४५० बसचालक आहेत. गत वर्षभरात या ४५० पैकी २८ बसचालकांनी एसटीचे अपघात केले. दळणवळणाचे हे साधन सर्वसामान्यांच्या दळणवळणाचे प्रमुख साधन आहे. हजारो प्रवाशांची या वाहनांतून दररोज गंतव्यस्थळी सुरक्षित ने-आण केली जाते. मात्र, काही वाहनचालक बस भरधाव चालवितात तसेच वाहतूक नियमांचे पालन करीत नाहीत. त्यामुळे अपघात घडतात. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० दरम्यान अमरावती जिल्ह्यात एसटी अपघाताच्या २८ घटना घडल्या. यामध्ये दोन प्राणांतिक अपघातांमध्ये तीन प्रवाशांचा जीव गेला. या अपघातांची चौकशी एसटीच्या विभाग नियंत्रकस्तरावर सुरू आहे. याशिवाय या प्रकरणांमध्ये चालकांचीही चौकशी होत आहे. यादरम्यान यंदा लॉकडाऊनमुळे एसटी बसची चाके सहा महिने ठप्प होती. यावेळी एसटीमधून मालवाहतूक करण्यात आली.त्यामुळे अपघाताचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत घटले आहे.
२०२० या वर्षभरात झालेले एसटीचे अपघात
जानेवारी - ४
फेब्रुवारी - ७
मार्च - ४
एप्रिल - ०
मे - ०
जून - ०
ऑगस्ट - १
सप्टेंबर - ०
ऑक्टोंबर - ५
नोव्हेंबर - ३
डिसेंबर - ४
१) जिल्ह्यात एसटी चालक -४५०
विना अपघात बस चालविली म्हणून सत्कार
१० वर्षापेक्षा जास्त सेवा - ०१
१५ वर्षापेेक्षा जास्त सेवा - ०३
बॉक्स : आहे.
७० ला एसटीचा स्पीड लॉक
तीन कोट आहेत.