सीईटी रद्द झाल्याने अकरावी प्रवेश कसे होणार? मनासारखे कॉलेज मिळण्यासाठी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:15 AM2021-08-15T04:15:18+5:302021-08-15T04:15:18+5:30

(असायमेंट) दहावीचा निकाल वाढला, उच्च न्यायालयाच्या आदेशाने गुणांच्या आधारे अकरावीत प्रवेश अमरावती : यंदा दहावीचा ऑनलाईन निकाल डोळे दीपवून ...

How will the 11th admission be due to cancellation of CET? Exercise to get a college like mind | सीईटी रद्द झाल्याने अकरावी प्रवेश कसे होणार? मनासारखे कॉलेज मिळण्यासाठी कसरत

सीईटी रद्द झाल्याने अकरावी प्रवेश कसे होणार? मनासारखे कॉलेज मिळण्यासाठी कसरत

Next

(असायमेंट)

दहावीचा निकाल वाढला, उच्च न्यायालयाच्या आदेशाने गुणांच्या आधारे अकरावीत प्रवेश

अमरावती : यंदा दहावीचा ऑनलाईन निकाल डोळे दीपवून टाकणारा ठरला. बहुतांश विद्यार्थी प्रावीण्यप्राप्त, प्रथमश्रेणी झळकले. मात्र, अकरावी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) उच्च न्यायालयाच्या आदेशाने रद्द झाली. त्यामुळे अकरावी प्रवेशाच्या जागा कमी, दहावीचा निकाल जास्त अशी स्थिती आहे. गुणी विद्यार्थी चिंतेत असून, मनासारखे कॉलेज मिळेल अथवा नाही, अशा द्विधा मनस्थितीत आहेत.

उच्च न्यायालयाने दहावीच्या गुणांच्या आधारे अकरावीत प्रवेश सहा आठवड्यात करण्याचे आदेश जारी केले आहे. त्यामुळे राज्य शिक्षण मंडळाला सीईटी परीक्षेचा गाशा गुंडाळावा लागला आहे. आता दहावीच्या गुणांच्या आधारे अकरावीत प्रवेश मिळेल, अशी नियमावली आहे. जिल्ह्यात दहावीचे ३८९६४ विद्यार्थी उत्तीर्ण असून, गुणांच्या आधारे त्यांना अकरावीत प्रवेश दिला जाणार आहे.

-------------------

विद्यार्थी स्थिती

दहावी : ३८९६४

अकरावी प्रवेशाची क्षमता : १५६७० (अमरावती महानगर)

-------------

अशी आहे शहरात शाखानिहाय जागा

कला : ३३७०

वाणिज्य : २४०३

विज्ञान : ६५४०

एमसीव्हीसी : ३०२०

-----------------

महाविद्यालयांचा ‘कट ऑफ’ वाढणार

यंदा दहावीच्या निकालाची टक्केवारी वाढली आहे. ९९.५७ टक्के निकाल लागला आहे. अकरावी प्रवेशासाठी ३१० जागा वाढल्या आहेत. तथापि, एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, असे नियोजन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समिती राबविणार असल्याची माहिती समन्वयक अरविंद मंगळे यांनी दिली.

------------------

विद्यार्थी चितेंत

यंदा दहावीचा निकालानंतर अकरावी प्रवेश मनासारख्या कॉलेजमध्ये मिळावा, यासाठी सीईटीची तयारी चालविली. मात्र, आता सीईटी नाही, थेट प्रवेश मिळणार आहे. यात गुणी विद्यार्थ्यांचे नक्कीच नुकसान होणारे आहे.

- चुटकी रोकडे, विद्यार्थिनी

----------------

दहावीचा निकाल जंबो लागला. त्यामुळे कोणत्या कॉलेजमध्ये कसा प्रवेश मिळेल, याचे तूर्त सांगता येणार नाही. मात्र, सीईटी परीक्षा झाली असती, तर यात खरे हुशार विद्यार्थी कोण, हे समोर आले असते. आता अकरावी प्रवेशात गुणी विद्यार्थांवर अन्याय होण्याची शक्यता आहे.

- अल्पेश वानखडे, विद्यार्थी,

---------------------

कोट

१६ ऑगस्टपासून अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू होत आहे. यंदा नक्कीच ‘ कट ऑफ’ वाढेल, असे संकेत आहेत. सीईटी परीक्षा रद्द झाल्याने अकरावी प्रवेशासाठी स्पर्धा होईल.

- दीपक धोटे, प्राचार्य, ब्रिजलाल बियाणी महाविद्यालय.

---------

कोट

- राजेश देशमुख, प्राचार्य, बॅ. आर.डी,आय.के.महाविद्यालय

Web Title: How will the 11th admission be due to cancellation of CET? Exercise to get a college like mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.