-तर अमरावती शहराचा मोठा परिसर झाला असता बेचिराख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 10:19 PM2018-05-26T22:19:58+5:302018-05-26T22:20:23+5:30
नांदगाव पेठ टोल नाक्याजवळ लिक्विड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) ने भरलेला टँकर शनिवारी पहाटे उलटला. प्रशासनाने संपूर्ण सावधगिरी बाळगून टँकरला चाकांवर ठेवले. यावेळी काहीही चूक झाली असती तरी उन्हाच्या पाऱ्याने गॅसचा भडका उडाला असता आणि चार ते पाच किलोमीटरचा परिसर बेचिराख झाला असता. यामुळे परिसरातील नागरिकांची भीतीने गाळण उडाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नांदगाव पेठ टोल नाक्याजवळ लिक्विड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) ने भरलेला टँकर शनिवारी पहाटे उलटला. प्रशासनाने संपूर्ण सावधगिरी बाळगून टँकरला चाकांवर ठेवले. यावेळी काहीही चूक झाली असती तरी उन्हाच्या पाऱ्याने गॅसचा भडका उडाला असता आणि चार ते पाच किलोमीटरचा परिसर बेचिराख झाला असता. यामुळे परिसरातील नागरिकांची भीतीने गाळण उडाली होती.
एलपीजीने भरलेला यूपी १७ एटी ४६९५ क्रमांकाचा महाकाय टँकर सुरतवरून वाडी (नागपूर) येथे नेण्यात येत होता. नांदगावपेठ टोल नाक्याजवळ नागपूरच्या दिशेने टँकर वळत असताना अचानक रस्तालगतचे कठडे तोडून उलटला. १७ ते १८ टन गॅस असलेल्या कंटेनरचे वजन ३५ टनाच्या आसपास होते. गॅस लिकेज झाला असता, तर चार ते पाच किलोमीटर परीसर बेचिराख झाला असता. मात्र, प्रशासनाने जलद पावले उचलून हा धोका टाळला. अग्निशमन दलासह गाडगेनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. अधिकाºयांनी क्रेन बोलावून टँकर चाकांवर ठेवण्यासाठी तीन क्रेन बोलावल्या. दुसरीकडे अग्निशमन चमू हातात फोम टेंडर घेऊन संभाव्य आग टाळण्यासाठी सज्ज होते.
चालक आझाद अली जखमी
एलपीजीने भरलेला टँकर चालक आझाद अली (२६, रा. प्रतापगढ, उत्तरप्रदेश) नागपूरला घेऊन निघाला होता. अकोला मार्गावरून वळत असताना अचानक टँकर सुरक्षा कठडे तोडून रस्त्यालगतच्या जागेवर जाऊन उलटला. या अपघातात जखमी आझाद अलीला उपचारासाठी इर्विनमध्ये दाखल करण्यात आले आहे.
अग्निशमन दल फोम टेंडर घेऊन सज्ज
टँकर उलटल्याची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी दाखल होत ट्रान्सपोर्ट उपकेंद्रप्रमुख सैयद अन्वर व मुख्य अग्निशमनचे चालक नसीबखां पठाण, राऊत, फायरमन दहातोंडे, सतीश घाटे, निखिल बाटे, शिवा आडे आग विझविण्यासाठी सज्ज झाले. टँकर क्रेनने पूर्वस्थितीला येताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.