हावडा-मुंबई मेलच्या इंजीनला आग, चालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 08:39 PM2018-05-06T20:39:28+5:302018-05-06T20:39:28+5:30
मुंबई हावडा छत्रपती टर्मिनस एक्सप्रेसच्या इंजीनला अचानकपणे आग लागल्याने चालकाने प्रसंगावधान राखत एअरब्रेक मारून उडी घेतली.
मोहन राऊत
धामणगाव रेल्वे : मुंबई हावडा छत्रपती टर्मिनस एक्सप्रेसच्या इंजीनला अचानकपणे आग लागल्याने चालकाने प्रसंगावधान राखत एअरब्रेक मारून उडी घेतली. यात एक चालक गंभीर जखमी झाला, तर दुस-या सहायक चालकाचे डोक भाजले. या घटनेमुळे प्रवाशात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही घटना धामणगावजवळील हिंगणगाव कासारखेड हद्दीत ४ वाजून १० मिनिटांनी घडली. पुलगाव दरम्यान चालक एस. क़े.विश्वकर्मा (३५) यांचा मृत्यू आहे़
धामणगाव रेल्वे स्थानकावर गाडी क्रमांक १२८१० हावडा मुंबईची येण्याची वेळ ४ वाजून १२ मिनीट असताना पोल क्रमांक ७१५ जवळ या गाडीच्या इंजीनला तांत्रिक कारणामुळे आग लागली. इंजिनमधून धूर निघत असल्याचे पाहून चालक ब्रम्हे यांनी प्रसंगावधान राखत एअरब्रेक मारून बाहेर उडी घेतली. याच दरम्यान सहायक चालकाने एअर कॉप्रेसरने आग विझविण्याचा प्रयत्न केला. तब्बल दहा मिनीट हे इंजिन जळत राहिले. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही प्रवाशांनी गाडीतून उडी घेतली़ मात्र, सुदैवाने गाडीचा वेग कमी झाल्याने प्रवाशांना दुखापत झाली नाही़
मालगाडीच्या चालकाची तत्परता
धामणगाव रेल्वे स्थानकाकडून पुलगावकडे जाणाºया मालगाडीला मेल एक्सप्रेसच्या इंजिनमधून धूर निघत असताना दिसले. धामणगाव रेल्वे स्थानकाचे अधीक्षक जे़डीक़ुलकर्णी यांच्याकडून तत्क्षण संदेश येताच ही मालगाडी थांबवून गंभीर चालकाला पुलगाव येथे रूग्णालयात दाखल केले़
ग्रामस्थांचीही मदत़
याच ठिकाणी ३० वर्षांपूर्वी हावडा अहमदाबाद या गाडीला अपघात झाला. त्यावेळेची घटनेची बाब अनेक ग्रामस्थांच्या लक्षात आली. नजीकच्या हिंगणगाव कासारखेड येथील ग्रामस्थांनी त्वरित घटनास्थळी पोहचून प्रवाशांना मदत केली़ मेल एक्सप्रेसचे सहायक चालकाचे डोके भाजल्याने बाजार समितीचे उपसभापती दुर्गाबक्षसिंह ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेऊन चालकाला उपचारासाठी बर्फ दिलेत़
प्रवासी गाड्या दोन तास उशिरा
हावडा-मुंबई या गाडीच्या इंजीनला आग लागल्याने ही गाडी धामणगाव रेल्वे स्थानकावर दोन तास उभी होती़ पूर्वीच दोन तास उशिरा धावणारी हावडा कुर्ला, वर्धा तर नियमित चालणारी विदर्भ एक्सप्रेस पुलगाव रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आली़