जिल्ह्यात हुडहुडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 01:08 AM2018-12-24T01:08:09+5:302018-12-24T01:10:18+5:30
उत्तर प्रदेशात शितलहर असल्याचा फटका जिल्ह्यासही बसला आहे. दोन दिवसांत पारा झपाट्याने खाली आलेला असून, शनिवारी यंदाचे सर्वाधिक निच्चांकी ७ अंश सेल्सिअस अशी नोंद झाली. रविवारीही हीच स्थिती कायम आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : उत्तर प्रदेशात शितलहर असल्याचा फटका जिल्ह्यासही बसला आहे. दोन दिवसांत पारा झपाट्याने खाली आलेला असून, शनिवारी यंदाचे सर्वाधिक निच्चांकी ७ अंश सेल्सिअस अशी नोंद झाली. रविवारीही हीच स्थिती कायम आहे. जिल्ह्यास हुडहुडी भरल्यामुळे संध्याकाळनंतर शहरातील रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला. ग्रामीणमध्ये ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून ऊब घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून आले.
हवामानतज्ञ्ज अनिल बंड यांच्या माहितीनुसार तापमानात २६ डिसेंबरपर्यंत चढउतार राहील. त्यानंतर तापमानात थोडा सुधार येईल. काही तुरळक ठिकाणी दव पडण्याची शक्यता आहे.
मागील आठवड्यापासून जिल्ह्यात १० अंशाच्या आसपास तापमान होते. मात्र, गेल्या २४ तासांत वातावरणात अचानक थंडावा आला व तापमान ७ अंशापर्यंत खाली गेले. गारव्यामुळे शहरातील नागरिकांनी सायंकाळनंतर घराबाहेर पडणे टाळले. रात्री नऊनंतर रस्ते ओस पडलेत. या बदलत्या वातावरणामुळे सर्दी-खोकल्याचे आजारदेखील बळावले आहे.