तूर डाळ विक्रीत प्रचंड लूट शासनादेशाला तिलांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 10:01 PM2018-07-14T22:01:56+5:302018-07-14T22:02:22+5:30

राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागामार्फत विक्री करण्यात आलेल्या तूरडाळीसाठी रास्त भाव दुकानदार जादा रक्कम वसूल करीत ग्राहकांची आर्थिक पिळवणूक करीत आहेत. यासंदर्भात नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी तक्रार केली आहे.

The huge loot in the sale of tur dal remains suspended | तूर डाळ विक्रीत प्रचंड लूट शासनादेशाला तिलांजली

तूर डाळ विक्रीत प्रचंड लूट शासनादेशाला तिलांजली

Next
ठळक मुद्देपुरवठा विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष : नगरसेवक तिरमारे यांची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागामार्फत विक्री करण्यात आलेल्या तूरडाळीसाठी रास्त भाव दुकानदार जादा रक्कम वसूल करीत ग्राहकांची आर्थिक पिळवणूक करीत आहेत. यासंदर्भात नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी तक्रार केली आहे.
राज्य शासनामार्फत बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत तुरीची भरडाई केल्यानंतर डाळीची विक्री राज्यातील स्वस्त धान्य दुकानातून करण्याबाबत निर्णय सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागातर्फे घेण्यात आला आहे. तूरडाळीची विक्री सर्व शिधापत्रकधारकांना धान्य दुकानदारांमार्फत वितरण करण्याच्या सूचना ३० नोव्हेंबर २०१७ च्या शासन परिपत्रकानुसार देण्यात आल्या होत्या. तूरडाळीची विक्री अधिक व्हावी, या उद्देशाने स्वस्त धान्य दुकानदारांकडून सर्वप्रथम ५५ रुपये किलोप्रमाणे तूरडाळ विक्री करण्यात आली. मात्र, एक महिन्यापूर्वी १४ जून रोजी तूरडाळ विक्रीसंदर्भात शासनाने नवीन निर्णय जारी करीत ३५ रुपयांत तूरडाळ विक्रीस आणली. मात्र, या शासन आदेशाला एक महिना लोटूनही स्थानिक पुरवठा विभाग स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत ५५ रुपयांनीच ग्राहकांना तूर डाळ विक्री होत आहे. तहसील कार्यालयाजवळ असलेल्या धान्य गोदामात अंदाजे ५२५ क्विंटल तूरडाळ अद्यापही उपलब्ध असून, पुरवठा विभाग ती स्वस्त धान्य दुकानदारांना विक्रीस का देत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे दाद
शासनाचा आदेश निघून एक महिना होत असतानाही स्थानिक पुरवठा विभागाकडून ३५ रुपये प्रतिकिलोने ग्राहकांना तूर डाळ दिली जात नाही. पुरवठा विभागाचे याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष असून, ग्राहकांची पिळवणूक होत आहे, अशी तक्रार नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी व चांदूर बाजारच्या तहसीलदारांकडे केली आहे.

५५ रुपये किमतीची तूर डाळ ३५ रुपये प्रतिकिलो दराने वाटप करण्याचे आदेश मिळाले आहेत. त्यानुसार पाकिटावरील किमती कमी करून लवकरच ग्राहकांना मिळणार आहे.
- रूपाली सोळंके,
पुरवठा निरीक्षक

Web Title: The huge loot in the sale of tur dal remains suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.