हुक्का पार्लरच्या परवानगीवर महापालिकेत खल

By admin | Published: May 12, 2017 01:32 AM2017-05-12T01:32:31+5:302017-05-12T01:32:31+5:30

बसस्थानक मार्गावरील ‘अड्डा-२७’ या हुक्का पार्लरवर पोलिसांनी धाड टाकल्याने अशा पार्लर्सच्या अधिकृततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Hukka Parlar's permission | हुक्का पार्लरच्या परवानगीवर महापालिकेत खल

हुक्का पार्लरच्या परवानगीवर महापालिकेत खल

Next

आमसभेत धोरण ठरणार : भंडारीचे आणखी चार अर्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बसस्थानक मार्गावरील ‘अड्डा-२७’ या हुक्का पार्लरवर पोलिसांनी धाड टाकल्याने अशा पार्लर्सच्या अधिकृततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. तरूणपिढीला बेफाम करणाऱ्या अशा हुक्का पार्लर्सना परवानगी कुणाची, याचा धांडोळा घेतला जात असताना महापालिकेतही हुक्का पार्लरच्या ‘नाहरकत’वर खल सुरू झाला आहे.
येथील घनशाम पन्नालालजी भंडारी (५०) यांनी महापालिका आयुक्तांच्या नावे पत्र लिहून ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र देण्याची विनंती केली आहे.
विशेष म्हणजे हे पत्र १० आॅक्टोबर २०१६ चे असून ते महापालिकेकडे मात्र ८ मे २०१७ ला पोहोचले आहे. भंडारी यांनी घनशाम पूल टेबल पार्लर, घनशाम हुक्का पार्लर, घनशाम व्हिडिओ गेम पार्लर अािण घनशाम कार्डरूम पार्लर अशा चार व्यवसायांसाठी ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र मागितले आहे. हे चारही पार्लर आपण मुख्य डाकघराजवळ असलेल्या ‘हॉटेल काश’मध्ये चालविणार असल्याचे या पत्रात नमुद आहे. भंडारीचे हे पत्र उपायुक्त नरेंद्र वानखडे यांच्याकडे दोन दिवसांपूर्वी आले असून ‘ना-हरकत’ देण्याबाबत नेमके काय निकष आहेत, याबाबतचा शासन निर्णय काय आहे,

एडीटीपी, बाजार परवाना विभागाला विचारणा
अमरावती : हे तपासून ‘ना-हरकत’ द्यायचे की कस, हे ठरवले जाणार आहे. हुक्का पार्लरला ‘ना-हरकत’ देण्यासंदर्भात महापालिकेत निश्चित असे धोरण नसल्याने हाविषय आमसभेसमोर ठेवण्यात येईल. त्यात धोरण ठरविण्यात येईल व त्यानंतर आमसभेने घेतलेला निर्णय अंतिम असेल, असे उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. बसस्थानक मार्गावरील ‘अड्डा २७’ व तिरुपती टॉवर्समधील हुक्कापार्लर बेकायदेशीररित्या चालत असल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर हुक्कापार्लर चालविण्यासाठी ‘एनओसी’ देण्यात यावी, असे पत्र महापालिकेला प्राप्त झाले आहे. हुक्का पार्लरला एनओसी देण्यासंदर्भात पालिकेने सावध भूमिका घेतली आहे.
घनश्याम हुक्का पार्लरच्या अनुषंगाने आपण अशाप्रकारे ना-हरकत प्रमाणपत्र दिले का, अशी विचारणा बाजार व परवाना विभाग आणि सहायक संचालक नगररचना विभागाकडे करण्यात आली आहे.

कायद्याचा पडतोय किस
हुक्का पार्लर व तत्सम पार्लरसंदर्भात एनओसी देण्यासाठी काय नियम आहेत, पालिकेने कुठल्या आधारावर एनओसी द्यावी, त्याबाबतचा शासन निर्णय काय आहे, याबाबत महापालिकेकडून माहिती घेतली जात आहे. परंतु आतापर्यंत महापालिका हद्दीतील अशा कुठल्याही पार्लरला महापालिकेने एनओसी दिली नसल्याचा दावा उपायुक्तांनी केला आहे.

 

Web Title: Hukka Parlar's permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.