पोपटखेडच्या जंगलात आढळली मानवी हाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 11:40 PM2018-01-21T23:40:03+5:302018-01-21T23:40:46+5:30

माहुली (धांडे) येथील मामी-भाच्याच्या प्रेमप्रकरणात मामा शेख शारीफ लतीफ शेख याची हत्या करून पाच महिने झाल्यानंतर व आरोपींच्या कबुलीजबाबानंतर नऊ दिवसांनी एका मृतदेहाचा सांगाडा दर्यापूर पोलिसांना पोपटखेडच्या जंगलात आढळून आला.

Human bones found in Poppethed forest | पोपटखेडच्या जंगलात आढळली मानवी हाडे

पोपटखेडच्या जंगलात आढळली मानवी हाडे

Next
ठळक मुद्देअवशेष कुणाचे? : डीएनए चाचणीनंतर पुष्टी, दर्यापूर पोलिसांना नऊ दिवसानंतर यश

आॅनलाईन लोकमत
अमरावती : माहुली (धांडे) येथील मामी-भाच्याच्या प्रेमप्रकरणात मामा शेख शारीफ लतीफ शेख याची हत्या करून पाच महिने झाल्यानंतर व आरोपींच्या कबुलीजबाबानंतर नऊ दिवसांनी एका मृतदेहाचा सांगाडा दर्यापूर पोलिसांना पोपटखेडच्या जंगलात आढळून आला. यामुळे पोलिसांनी तूर्तास सुटकेचा श्वास टाकला आहे.
मृतक शारीफची पत्नी फरजाना परवीन व भाचा अल्ताफ शाह साबीर शाह यांच्या प्रेमसंबंधात अडसर ठरणाºया शारीफचा जावेद शाह, मोसीन शाह, हुसेन शाह यांच्या मदतीने दुचाकी खरेदी करण्याच्या बहाण्याने दर्यापूर येथून अकोट-पोपटखेड रोडवर नेऊन गळा आवळून खून करण्यात आला. दुसºया दिवशी दर्यापूर पोलीस स्टेशनला शारीफ हरवल्याची तक्रार दाखल केली होती. पण, साळा फिरोज शाह (रा. मोर्शी) याने अल्ताफकडून खुनाची कबुली घेऊन दर्यापूर पोलिसांना आरोपींना अटक करण्यास भाग पाडले. १२ जानेवारीला आरोपींनी खुनाची कबुली दिली. पण, मृतदेह आढळला नव्हता.
२० जानेवारीला आरसीपीचे २१ जणांचे पथक व दर्यापूर पोलीस ठाण्याचे आठ अधिकारी-कर्मचारी पोपटखेड जंगलात शोध घेत असताना सायंकाळच्या सुमारास मानवी कवटी, दात, पायाचे व हाताचे हाड सापडले व इतर अवयव सापडले. जंगली जनावरांनी शरीराचे लचके तोडल्याचे दिसून येत होते. सापडलेले अवयव मृत शारीफचे असल्याचे पोलीस दावा करीत आहेत. माहुली (धांडे) येथील शारीफ हत्याकांड उघडकीस आणण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे व दर्यापूरचे ठाणेदार मुकुंद ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. डीएनए चाचणीनंतर मृतदेहाबाबत पुष्टी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
यांनी लावला खुनाचा छडा
मृतक शारीफचा मृतदेह मिळून येण्याकरिता मागील नऊ दिवसापासून रात्रंदिवस एक करूण शोध घेणारे रितेश राऊत तपास अधिकारी, मंगेश मोहोड पीएसआय, पोलीस कर्मचारी प्रशांत ढोके, सिद्धांत आठवले, विनोद पवार, सौरभ धरमठोक, सागर नाटे, रूपेश गावंडे व पोलीस मित्र शाकीर हुसेन या तपास पथकाने शारीफ हत्याकांडाचा छडा लावला.

Web Title: Human bones found in Poppethed forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.