भारतीय संविधानाने दिला जगाला मानवतेचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 23:19 IST2017-11-26T23:19:25+5:302017-11-26T23:19:54+5:30
संपूर्ण विश्वाला मानवता, बंधुता, समता व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे एकमेव भारतीय संविधान असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या विश्वाला ही भेट दिली असल्याचे प्रतिपादन बबलू देशमुख यांनी केले.

भारतीय संविधानाने दिला जगाला मानवतेचा संदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संपूर्ण विश्वाला मानवता, बंधुता, समता व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे एकमेव भारतीय संविधान असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या विश्वाला ही भेट दिली असल्याचे प्रतिपादन बबलू देशमुख यांनी केले.
जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण) चे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात ‘संविधान दिवस’ साजरा झाला. यावेळी बबलू देशमुख यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमांचे पूजन झाले. २६-११ च्या मुंबई हल्ल्यात शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक भय्यासाहेब मेटकर यांनी, तर संविधान प्रास्ताविकाचे सामुदायिक वाचन करण्यात आले. समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता, दर्जाची व संधीची समानता, व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्रीय एकता वृद्धींगत करणारे भारताचे संविधान हे जगात सर्वात सुंदर असून देशाचा हा राष्ट्रग्रंथ आहे. संविधान प्रत्येकास माहीत असणे व त्यानुसार वर्तणूक करणे, कर्तव्य व जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे, असे मत देशमुख यांनी व्यक्त केले. यावेळी माजी मंत्री यशवंतराव शेरेकर, प्रल्हाद ठाकरे, प्रकाश काळबांडे, संजय वानखडे, उषा उताणे, सतीश धोंडे, संजय लायदे, हेमंत यावले, संजय मापले, बापुराव गायकवाड, श्रीराम नेहर, भागवत खांडे, बिट्टू मंगरोळे, विशाल भट्टड, समाधान दहातोंडे, बच्चू बोबडे, बबलू बोबडे, दिलीप तायडे, मंगेश अटाळकर, संजय मापले आदी उपस्थित होते.