मंगरूळच्या शंभर शेतकऱ्यांची विमा कंपनी विरुद्ध तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:13 AM2021-07-29T04:13:37+5:302021-07-29T04:13:37+5:30
आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा करणार तपास धामणगाव रेल्वे परिसरातील तब्बल दोनशे अधिक शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी ...
आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा करणार तपास
धामणगाव रेल्वे
परिसरातील तब्बल दोनशे अधिक शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी विरुद्ध मंगरूळ दस्तगीर येथील पोलीस ठाण्यात आज शंभरच्या अधिक शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली असून या तक्रारीचा तपास आता आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा करणार आहे.
धामणगाव तालुक्यात सर्वाधिक शेतकऱ्यांनी गतवर्षी विमा काढला होता यात सोयाबीन कपाशी पिकाचा विमा हप्ता इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीकडे भरला होता परंतु शेतीपिकांचे ८० ते १००टक्के नुकसान होऊन सुद्धा सदर कंपनीकडून संरक्षित रक्कम न मिळता तुटपुंजी व नाममात्र रक्कम मिळाली होती मागील वर्षी सन २०२० मध्ये सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे शंभर टक्के तर कपाशीचे ८८ टक्के नुकसान झाले राज्य शासनाने एकरी दहा हजार रुपये मदत दिली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित केला आणेवारी ४७ पैसे जाहीर करन्यात आली विमा कंपनी कडून बँक खात्यात बँक खात्यात दोन हजार ते चार हजार ७०० रुपये तोडकी रक्कम जमा झाली काही शेतकऱ्यांच्या बँकेत तेरा हजार ते वीस हजार रुपये रक्कम झाले त्यामुळे कंपनीकडून भेदभाव व फसवणूक झाल्याचे स्पष्ट दिसत आहे त्यामुळे कंपनीविरुद्ध आज मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्यात शंभरच्या अधिक शेतकऱ्यानी तक्रार दाखल केली या तक्रारीचा तपास आता आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा करणार आहे ही तक्रार येथील सरपंच सतीश हजारे, गुरुदास ढाकुलकर, सुरेश ढेंमरे शेख रउफ गुलाम हुसेन, विजय आंबटकर, नरसिंग ढेंमरे, दिनेश निचत, शशांक लोमटे, सतीश ढेंमरे ,निखिल ढेमरे यांनी केली आहे सदर तक्रार ही येथील ठाणेदार सुरज तेलगोटे यांच्याकडे दिली आहे