राणा दाम्पत्यासह युवा स्वाभिमानच्या शेकडो कार्यकत्यांविरुद्ध अमरावतीत गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 10:50 PM2022-05-29T22:50:59+5:302022-05-29T22:52:07+5:30
मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसाचे पठण करण्यासाठी मुंबईत पोहोचलेल्या राणा दाम्पत्याला १४ दिवस न्यायालयीन कोठडीला सामोरे जावे लागले. त्यानंतर ते दिल्लीला गेलेत. तब्बल ३६ दिवसांनंतर अमरावतीत पोहोचलेल्या राणा दाम्पत्याचे शहरात ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले.
अमरावती - खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यासह त्यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांविरुद्ध शहर कोतवाली, नांदगाव पेठ, राजापेठ व गाडगेनगर पोलिसांनी विनापरवानगी रॅली, वाहतुकीला खोळंबा, विनापरवानगी जमाव जमविल्याबाबत गुन्हे दाखल केले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षकांच्या तक्रारीवरून २८ मे रोजी रात्री हे गुन्हे दाखल करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसाचे पठण करण्यासाठी मुंबईत पोहोचलेल्या राणा दाम्पत्याला १४ दिवस न्यायालयीन कोठडीला सामोरे जावे लागले. त्यानंतर ते दिल्लीला गेलेत. तब्बल ३६ दिवसांनंतर अमरावतीत पोहोचलेल्या राणा दाम्पत्याचे शहरात ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले.
रहाटगाव, पंचवटी, इर्विन चौक, राजकमल चौक, जयस्तंभ चौक व राजापेठेत त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा झाला, तर अनेक ठिकाणी डीजेच्या आवाजाने ध्वनिमर्यादा ओलांडली. त्यामुळे गाडगेनगर पोलिसांनी आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्याविरुद्ध भादंविचे कलम २९१, ३४१, १४३ व मपोकाच्या १३५ अन्वये गुन्हा दाखल केला. राजापेठ पोलिसांनीदेखील राणा समर्थकांविरुद्ध भादंविचे कलम १८८, ३४१ व मपोकाच्या १३५ अन्वये गुन्हा दाखल केला. सोबतच शहर कोतवाली व नांदगाव पेठ पोलिसांनीदेखील युवा स्वाभिमानच्या शेकडो कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.