पेट्रोल-डिझेलची शंभरीकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:10 AM2021-01-02T04:10:56+5:302021-01-02T04:10:56+5:30
अमरावती : १ सप्टेंबर रोजी ८९.३६ रुपये असलेले पेट्रोलचे दर आता ९१.७२ रुपये झाले आहेत. त्यापूर्वी २४ सप्टेंबर रोजी ...
अमरावती : १ सप्टेंबर रोजी ८९.३६ रुपये असलेले पेट्रोलचे दर आता ९१.७२ रुपये झाले आहेत. त्यापूर्वी २४ सप्टेंबर रोजी ते ८८.९४ रुपये असे काहीसे घसरले होते. डिझेलचा दर १ सप्टेंबर रोजी ७९.५५ रुपये होता. तो २४ सप्टेंबर रोजी ७७.४० रुपयांवर घसरला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा आता हा दर ८०.५१ रुपये झाला आहे. कोरोनाकाळात वाहतूक पूर्णत: ठप्प असतानाही पेट्रोल-डिझेलचे दर फार मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे आढळले नाही.
देशाची गरज पूर्ण करणारे बहुतेक इंधन आयात केले जात असल्याने जागतिक स्तरावर किमतीशी सुसंगत दर देशांतर्गत खनिज तेलाची विक्री करणाऱ्या कंपन्या ठेवतात. त्यामध्ये व्हॅट व आबकारी कर तसेच काही प्रमाणात स्थानिक कर मिळवून पेट्रोल-डिझेलचे दर ठरविले जातात.
किराणा मालाच्या किमती वधारल्या.
केंद्र शासनाने विक्री करणाऱ्या कंपन्यांना दरस्वातंत्र्य दिल्याने दैनंदिन दर कमी जास्त होत असतात. त्यानुसार पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे दळणवळण महागल्याने किराणा मालात दरवाढ अनुभवास येत आहे. खाद्यतेल तब्बल ४० रुपयांनी वधारले आहे.
------------
डिझेलच्या दरवाढीमुळे मालवाहतुकीतून होणाऱ्या मिळकतीवर परिणाम होत आहे. इंधन व वाहनाचा घसारा वगळून दैनंदिन मजुरी जुळून येत नाही. नवीन वर्षात हे चढे दर कमी होतील, अशी अपेक्षा आहे.
- गजानन आंबटपुरे, वाहनचालक
१ सप्टेंबरपासून दरवाढ
दिनांक पेट्रोल डिझेल
१ सप्टेंबर ८९.३६ ७९.५५
१५ सप्टेंबर ८८.८६ ७८.५२
१ ऑक्टोबर ८८.३९ ७६.३७
१५ ऑक्टोबर ८८.३९ ७६.३७
२४ ऑक्टोबर ८८.९४ ७७.४०
१ जानेवारी ९१.७२ ८१.९२