पंढरी मध्यम प्रकल्पावर शेकडो प्रकल्पग्रस्तांचे अन्न-जलत्याग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 10:16 PM2018-10-12T22:16:59+5:302018-10-12T22:17:32+5:30

पंढरी मध्यम प्रकल्प, दाभी प्रकल्पग्रस्तांनी भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष विजय श्रीराव यांच्या नेतृत्वात पंढरी मध्यम प्रकल्पावर शुक्रवारपासून अन्न-जलत्याग आंदोलन सुरू केले. मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पस्थळी येऊन मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा १३ आॅक्टोबरला दुपारी ४ वाजता जलसमाधी घेणार असल्याचे आंदोलनकांनी जाहीर केले. या आंदोलनाने भाजपाला घरचा आहेर मिळाल्याची चर्चा होत आहे.

Hundreds of Project Affected Food and Saving Activists on Pandhari Medium Project | पंढरी मध्यम प्रकल्पावर शेकडो प्रकल्पग्रस्तांचे अन्न-जलत्याग आंदोलन

पंढरी मध्यम प्रकल्पावर शेकडो प्रकल्पग्रस्तांचे अन्न-जलत्याग आंदोलन

Next
ठळक मुद्देदुपारपर्यंत अल्टिमेटम : मुख्यमंत्र्यांनी भेट न घेतल्यास जलसमाधी

लोकमत न्यूज नेटवर्क
वरुड/पुसला : पंढरी मध्यम प्रकल्प, दाभी प्रकल्पग्रस्तांनी भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष विजय श्रीराव यांच्या नेतृत्वात पंढरी मध्यम प्रकल्पावर शुक्रवारपासून अन्न-जलत्याग आंदोलन सुरू केले. मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पस्थळी येऊन मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा १३ आॅक्टोबरला दुपारी ४ वाजता जलसमाधी घेणार असल्याचे आंदोलनकांनी जाहीर केले. या आंदोलनाने भाजपाला घरचा आहेर मिळाल्याची चर्चा होत आहे.
१२ वर्षांपासून अपूर्ण प्रकल्प पूर्ण व्हावा, शेतकऱ्यांना नवीन दरानुसार फरकाची रक्कम, मोबदला तातडीने अदा करावा, स्थानिक मच्छीमार संस्था निर्माण करण्याची परवानगी भोई समाजाला द्यावी, प्रकल्पग्रस्त दाखला परत घेऊन १० लाख रोख द्यावे, खापरखेडा पुनर्वसनकरिता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून द्यावी आदी मागण्या आंदोलकांनी मांडल्या. शुक्रवारी सकाळी ९ पासून विजय श्रीराव यांच्या नेतृत्वात अन्न-जलत्याग आंदोलनास प्रारंभ झाला. १३ आॅक्टोबरला दुपारी ४ वाजेपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: आंदोलनस्थळी येऊन मागण्या मंजूर कराव्या, अन्यथा कोणत्याही क्षणी शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकरी जलसमाधी घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले. आंदोलनाला काँग्रेससह अन्य संघटनांनीही पाठिंबा दिला आहे. शेंदूरजनाघाट ठाणेदार शेषराव नितनवरे यांनी शेकडो पोलीसांचा चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
भाजपचे विजय श्रीराव, प्रभाकर काळे, युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव विक्रम ठाकरे, उपसभापती चंद्रशेखर अळसपुरे, पुसला ग्रामपंचायत सरपंच सारिका चिमोटे, उपसरपंच अतुल बगाडे, गजानन डाहाके, भाजपचे इंद्रभूषण सोंडे, स्वप्निल मांडळे, धनराज तडस, सुभाष डोंगरे, चंद्रशेखर ढोरे, नरेंद्र कुरवाळे, राजू बागडे, मोतीराम ताटस्कर, अजाब राहुरकर, सुधाकर पाटील, विलास पवार, नितीन ढोरे, दानाजी फरकाडे, लीलाधर खराळकर, मनोज डोंगरे, सरंपच जानराव उईके, अजाब बोदड, सकू धुर्वे, प्रशांत अजमिरे, राजेंद्र राजूरकर, बाबाराव डहाके, राजू वरूडकर, गणेश वानखडे, गजानन कुरवाळेसह शेकडो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान, प्रकल्पस्थळी जमाव पाहून अधिकाºयांनी ऐनवेळी मशिन बाहेर काढून कामाचा देखावा केल्याची चर्चा होती.

Web Title: Hundreds of Project Affected Food and Saving Activists on Pandhari Medium Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.