पशुधनाची भूक वाळलेल्या चाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 12:54 AM2019-05-04T00:54:06+5:302019-05-04T00:57:18+5:30

दुष्काळाची दाहकता वाढलेले असताना दुधाळ जनावरांसाठी आवश्यक असलेल्या सरकीच्या ढेपीचेही भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे पशुपालकांना ढेप खरेदी करणे परवडत नसल्याने जिल्ह्यातील ५ लाख १२ हजार ६० दुधाळ जनावरांची भूक वाळलेल्या चाऱ्यावर भागवली जात आहे.

Hunger hunger hungry | पशुधनाची भूक वाळलेल्या चाऱ्यावर

पशुधनाची भूक वाळलेल्या चाऱ्यावर

Next
ठळक मुद्देदुग्धोत्पादनाला फटका : हिरवे वैरण नसल्याने पशुपालक चिंतेत

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दुष्काळाची दाहकता वाढलेले असताना दुधाळ जनावरांसाठी आवश्यक असलेल्या सरकीच्या ढेपीचेही भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे पशुपालकांना ढेप खरेदी करणे परवडत नसल्याने जिल्ह्यातील ५ लाख १२ हजार ६० दुधाळ जनावरांची भूक वाळलेल्या चाऱ्यावर भागवली जात आहे. परिणामी दुग्धोत्पादनाला फटका बसत आहे. दुधाळ जनावरांच्या खाद्याकडे विशेष लक्ष दिल्यास दूध वाढविण्यासाठी मोठा फायदा होतो.त्यामध्ये प्रथिने युक्त खाद्य जर त्यांना मिळाले तर गाई, म्हशींचे आरोग्य चांगले राहते. परंतु सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे प्रथिनेयुक्त खाद्य किंवा हिरवा चारा मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यातही वेगवेगळ्या खाद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. हे दर पशुधन पालकांना परवडणारे नाहीत. जिल्ह्यात दृष्काळी स्थिती असल्याने याचा फटका पशुधनालाही अधिक बसत आहे. दृष्काळी परिस्थितीत लहान पशुधनाला प्रतीदिवस २० लिटर साधारणपणे पिण्यास पाणी, तर ३ किलो चारा तर मोठया पशुनाला ४० लिटर पाणी अन ६ किलो चारा लागत असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर्षी विहीर, बोअरचे पाणी आटल्याने हिरव्या चाऱ्याचे उत्पादन घेणे कठीण झाले आहे. यामुळे जिल्हाभरातील ५ लाख १२ हजार ६० मोठ्या दुधाळ पशुधनाची भूक सोयाबीन, तूर, हरभरा या वाळलेल्या चाºयावरच भागवावी लागत आहे. किरकोळ ठिकाणीच हिरवा मका, बहूवार्षिक थोंब्याचा चारा पशुधनाला टाकला आहे. सध्या वाळलेल्या चाराच पशुधनासाठी वरदान ठरत आहे. १५ जूनपर्यंत पशुधनाची भूक वाळलेल्या चाºयावर भागू शकेल एवढी तरतूद असली तरी हिरवा चारा नसल्याने दूध उत्पादन १० टक्के घटल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

१६ हजार हेक्टरवर गाळपेर क्षेत्र
पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्ह्यात १६,११५ हेक्टरवर गाळपेर क्षेत्र आहे. वैरणविकास योजनेतून बहुवार्षिक थोंबे, जिल्हा वार्षिक योजनेतून बाजारी बियाणे वाटप, राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत मका बियाणे, पशुधनाचे वैरणासाठी २४ हजार ५०० लाभार्थ्याना वाटप करण्यात आले.

दृष्काळग्रस्त परिस्थितीमुळे पशुधनाला पुरेसे पाणी व चारा आवश्यक आहे. १५ जूनपर्यंत पशुधनाला पुरेल एवढा वाळलेला चारा सध्या जिल्ह्यात आहे. हिरवा चाºयाअभावी दूध उत्पादनात १० टक्के घट झाली. वैरण विकास योजनेतून उपाययोजना केल्या आहेत.
- डॉ विजय राहाटे,
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी

अमरावती ३७ हजार ५१३, अचलपूर ४५०३३, अंजनगाव सुर्जी २६०२९, भातकुली २५९९९, चिखलदरा ४९४१०, चांदूर रेल्वे २६००३, चांदूर बाजार ३५१७०, धारणी ६३९११, धामणगाव रेल्वे ३१२५९, दर्यापूर ३३३२९, मोर्शी ३८२१८, नांदगाव खंडेश्वर ३२०३२, तिवसा २६१३८ आणि वरूड ४२०१६ असे एकूण ५ लाख १२ हजार ६० पशुधनाची संख्या १९ वी पशुगणना २०१२ नुसार आहे.

Web Title: Hunger hunger hungry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.