उपोषणकर्ते चढले विभागीय आयुक्तालयाच्या टेरेसवर; उपोषणाचा २१वा दिवस, प्रशासनाची तारांबळ 

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: December 26, 2023 08:04 PM2023-12-26T20:04:15+5:302023-12-26T20:04:26+5:30

शासन प्रशासनाद्वारे कोणतीही दखल घेण्यात न आल्याने उपोषणकर्त्यांसह कार्यकर्ते २१ व्या दिवशी संतापले.

hunger strikers climbed onto the terrace of the Divisional Commissionerate 21st day of hunger strike, administration's star |  उपोषणकर्ते चढले विभागीय आयुक्तालयाच्या टेरेसवर; उपोषणाचा २१वा दिवस, प्रशासनाची तारांबळ 

 उपोषणकर्ते चढले विभागीय आयुक्तालयाच्या टेरेसवर; उपोषणाचा २१वा दिवस, प्रशासनाची तारांबळ 

अमरावती : कोळी महादेव जमातीला लोकांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवारी पाच वाजता दोन उपोषणकर्त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या टेरेसवर धाव घेतली व खाली उडी मारून आत्महत्येचा इशारा दिला. त्याच वेळी काही कार्यकर्त्यांनी आवारात ठिय्या देत प्रचंड नारेबाजी केली. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली.

शासन प्रशासनाद्वारे कोणतीही दखल घेण्यात न आल्याने उपोषणकर्त्यांसह कार्यकर्ते २१ व्या दिवशी संतापले. यावेळी दोन्ही उपोषणकर्त्यांनी तिसऱ्या माळ्यावरील टेरेसवर घाव घेतली व मागण्या मान्य न केल्यास खाली उडी मारण्याची धमकी दिली. विभागीय आयुक्त डाॅ. निधी पाण्डेयसह उपायुक्त, काही अधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांनी त्वरित भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि समजूत घालत त्यांना खाली उतरविले.

Web Title: hunger strikers climbed onto the terrace of the Divisional Commissionerate 21st day of hunger strike, administration's star

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.