विदर्भावर ‘गुलाब‘ चक्रीवादळाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:13 AM2021-09-27T04:13:15+5:302021-09-27T04:13:15+5:30

अमरावती : उत्तर बंगालच्या उपसागरात गुलाब चक्रीवादळ तयार झाले असून आंध्र प्रदेश, ओडिशा किनारपट्टीवरून ते विदर्भाकडे सरकणार आहे. त्यामुळे ...

Hurricane 'Rose' hits Vidarbha | विदर्भावर ‘गुलाब‘ चक्रीवादळाचे संकट

विदर्भावर ‘गुलाब‘ चक्रीवादळाचे संकट

Next

अमरावती : उत्तर बंगालच्या उपसागरात गुलाब चक्रीवादळ तयार झाले असून आंध्र प्रदेश, ओडिशा किनारपट्टीवरून ते विदर्भाकडे सरकणार आहे. त्यामुळे विदर्भात चार दिवस पाऊस राहणार असल्याने काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाची नासाडी होण्याची दाट शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे.गुलाब चक्रीवादळ रविवारी संध्याकाळी आंध्रप्रदेश-ओडिशा किणारपट्टीवर पोहचण्यासाठी वातावरण अणुकुल आहे. हे वादळ पश्चिम-वायव्य दिशेने वाटचाल करीत छत्तीसगड, तेलंगणामार्गे विदर्भाकडे वाटचाल करण्याची शक्यता आहे. परंतु, जमिनीवर पोहचल्यानंतर या वादळाची तीव्रता कमी होणार आहे। परंतु या वादळाच्या प्रभावाने विदर्भात पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे ऐक नवीन कमी दाबाचे क्षेत्र ईशान्य बंगालच्या उपसागरात २७ सप्टेंबर रोजी तयार होऊन ते २८ ला पश्चिम बंगाल कीणारपट्टिवर धडकण्याची शक्यता आहे। वरील सर्व परिस्थिती मुळे विदर्भातील पाऊस लवकर थांबेल असे वाटत नाही.

प्रा अनिल बंड

Web Title: Hurricane 'Rose' hits Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.