मिनीट्रकच्या धडकेत पती पत्नी ठार; दोन वर्षीय चिमुकला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2023 08:40 PM2023-03-02T20:40:16+5:302023-03-02T20:41:52+5:30

Amravati News कुटाराने भरलेल्या मिनी ट्रकने रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या तिघांना जोरदार धडक दिली. यात पती पत्नी घटनास्थळीच ठार झाले. तर त्यांचा दोन वर्षीय चिमुकला गंभीर जखमी झाला.

Husband and wife killed in collision with minitruck; A two-year-old child was injured | मिनीट्रकच्या धडकेत पती पत्नी ठार; दोन वर्षीय चिमुकला जखमी

मिनीट्रकच्या धडकेत पती पत्नी ठार; दोन वर्षीय चिमुकला जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देमाहुली जहांगिर ठाण्याच्या हद्दीतील अपघात

अमरावती: कुटाराने भरलेल्या मिनी ट्रकने रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या तिघांना जोरदार धडक दिली. यात पती पत्नी घटनास्थळीच ठार झाले. तर त्यांचा दोन वर्षीय चिमुकला गंभीर जखमी झाला. माहुली जहांगिर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तेलाई नाल्याजवळ २ मार्च रोजी दुपारी २.३० च्या सुमारास हा अपघात घडला.

विजय अन्नाजी शिंदे (२८) व ऋतुजा विजय शिंदे (२४, रा. जळका जगताप, ता. चांदूररेल्वे) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. यात त्यांचा मुलगा देवांशू (२ वर्षे) हा जखमी झाला असून त्याला अमरावतीच्या एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विजय हे पत्नी व मुलासह आपल्या दुचाकीने शिराळा मार्गावरील देवरा येथे स्वत:च्या बेड्यावर जात होते. पुसद्याहून शिराळामार्गे देवराकडे जात असताना विजय शिंदे हे दुपारी २.३० ते ३ च्या सुमारास तेलाई नाल्याजवळच्या रोडच्या कडेला चुुलतभावाशी बोलण्यासाठी थांबले. ते चुलतभावाशी बोलत असताना त्यांची पत्नी व मुलगा देखील रोडच्या खाली उभे होते. तेवढ्यात शिराळाकडून कुटार वाहून नेणाऱ्या एमएच २७ बीएक्स ५०६६ या मिनी ट्रकने तिघांनाही जोरदार धडक दिली. यात शिंदे दाम्पत्य ठार झाले. तर उपस्थित चंदन शिंदे यांनी पुतण्या देवांशूला अमरावती हलविले. अपघातानंतर तो मिनी ट्रक रस्त्यावरच उलटला. वाहनातील सहा मजूर देखील जखमी झाले. तर वाहनचालक पळून गेला. याप्रकरणी माहुली जहांगिर पोलिसांनी वाहनचालकाविरूध्द गुन्हा दाखल केला.

Web Title: Husband and wife killed in collision with minitruck; A two-year-old child was injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.