जावरा ग्रामपंचायतमध्ये पती-पत्नीने पटकाविल्या तीन जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:13 AM2021-01-21T04:13:36+5:302021-01-21T04:13:36+5:30

आज नको नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील सात सदस्यीय जावरा ग्रामपंचायतीमध्ये पतीने दोन जागी विजयी मिळविला, तर पत्नीही सदस्य झाली ...

Husband and wife won three seats in Jawara Gram Panchayat | जावरा ग्रामपंचायतमध्ये पती-पत्नीने पटकाविल्या तीन जागा

जावरा ग्रामपंचायतमध्ये पती-पत्नीने पटकाविल्या तीन जागा

Next

आज नको

नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील सात सदस्यीय जावरा ग्रामपंचायतीमध्ये पतीने दोन जागी विजयी मिळविला, तर पत्नीही सदस्य झाली आहे.

प्रशांत ठाकरे यांनी प्रभाग २ व ३ उमेदवारी दाखल केली होती. ते दोन्ही ठिकाणी विजयी झाले, तर पत्नी वृषाली प्रशांत ठाकरे यांनी प्रभाग १ मधून विजयी झाल्या. प्रशांत ठाकरे हे उपसरपंच व त्यानंतर सरपंच झाले होते. २००७-०८ मध्ये तंटामुक्तीचे अध्यक्षपदी असताना गावाला तंटामुक्त गावाचा पुरस्कार प्राप्त झाला होता. या दाम्पत्यासह ग्राम विकास पॅनेलचे अनिता नारनवरे, प्रतिभा मोहोड, जयश्री पालेकर विजयी झाले. परिवर्तन पॅनेलचे सुनील झाकर्डे यांनी विजय मिळविला.

ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन आहे.

२०१०-११ मध्ये ग्रामपंचायतीला पर्यावरण संतुलित ग्राम पुरस्कार योजनेचा पुरस्कार मिळाला तसेच २०१२ ते २०१४ अशी सतत दोन वर्ष संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानातही या ग्रामपंचायतीने पुरस्कार पटकाविला. या ग्रामपंचायतीला २०१७-१८ मध्ये स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त झाला आहे.

या ग्रामपंचायतीला आयएसओ नामांकन प्राप्त असून, येथे डिजिटल शाळा व गावात सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले तसेच पिण्याच्या पाण्याचा आरो प्लांट उभारण्यात आला आहे.

Web Title: Husband and wife won three seats in Jawara Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.