पतीने पकडले, भासऱ्याने केला अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:15 AM2021-04-23T04:15:12+5:302021-04-23T04:15:12+5:30
पोलीससूत्रानुसार, राकेश सतरामदास जेठाणी (३७, भासरा), दीपक सतरामदास जेठाणी (३६, पती ) (दोन्ही रा. कृष्णानगर गल्ली क्रमांक ३) असे ...
पोलीससूत्रानुसार, राकेश सतरामदास जेठाणी (३७, भासरा), दीपक सतरामदास जेठाणी (३६, पती ) (दोन्ही रा. कृष्णानगर गल्ली क्रमांक ३) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी २४ वर्षीय पीडित महिलेने पोलिसांत तक्रार नोंदविली. ती घरात झोपली असताना, पतीचा मोठा भाऊ घरात शिरला, त्याने शरीर सुखाची मागणी केली. परंतु तिने नकार दिला. त्यामुळे पतीने पकडून ठेवले आणि त्यानंतर त्याच्या भासऱ्याने लैंगिक अत्याचार केला. याबाबत कुठे वाच्छता केल्यास जिवाने मारून टाकेन, अशी धमकीही आरोपींनी दिल्याचा आरोप पीडित महिलेने तक्रारीतून केला आहे. यावरून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुध्द भादंविचे कलम ३७६(ड), ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनात एपीआय पूजा खांडेकर करीत आहेत.