पती म्हणाला, मी नामर्द; तू परक्यासोबत शय्यासोबत कर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2021 12:29 PM2021-08-07T12:29:42+5:302021-08-07T12:30:21+5:30
Amravati News ‘मी तुला अपत्यसुख देऊ शकत नाही, म्हणून तू माझ्या दोस्ताशी शय्यासोबत कर, असे बजावत एका पतीनेच आपल्या पत्नीवर बलात्कार घडवून आणल्याची संतापजनक घटना येवदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात उघड झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ‘मी तुला अपत्यसुख देऊ शकत नाही, म्हणून तू माझ्या दोस्ताशी शय्यासोबत कर, असे बजावत एका पतीनेच आपल्या पत्नीवर बलात्कार घडवून आणल्याची संतापजनक घटना येवदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात उघड झाली.
महिलेच्या पतीची संमती असल्याने त्या व्यक्तीने पीडितावर वारंवार शारीरिक बळजबरी केली. तो अनन्वित छळ सहन न झाल्याने अखेर पीडिताने येवदा पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी पीडिताच्या पतीसह तिचेवर बळजबरी करणाऱ्या सैय्यद नसीम सैय्यद यासीन (३८, रा. वडनेर गंगाई) विरूद्ध भादंविचे कलम ३७६ (२), (एच), (एन), ४५२, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, पीडिताचे सन २०१३ मध्ये लग्न झाले. ती सध्या गर्भवती असल्याने माहेरी आहे. तत्पूर्वी डिसेंबर २०२० ते जुलै २०२१ दरम्यान पीडितावर आरोपीने बळजबरी केली. पतीच्या ओळखीतील म्हणून आरोपीचे पीडिताच्या घरी येजा होती. डिसेंबर २०२० मधील एक दिवस आरोपी पीडिताच्या घरी आला. त्याचेसोबत शय्यासोबत कर, अन्यथा घटस्फोट देईन, अशी धमकी पतीने पीडिताला दिली. धमकी देऊन आरोपी पती घराबाहेर पडला. त्यानंतर आरोपी सै. नसीम सै. यासीन याने पीडितावर बळजबरी केली. त्यानंतरही आरोपीने पीडिताच्या घरात शिरून शारीरिक अत्याचार केला.
म्हणून तक्रारीला उशीर
माझ्यामुळे तुला अपत्यप्राप्ती होऊ शकत नाही. त्यामुळे तू परक्यासोबत शय्यासोबत कर, अन्यथा घटस्फोटासाठी तयार राहा, अशी धमकी देत आरोपी पतीनेच आपल्याला बाध्य केले. पतीने दिलेल्या धमकीमुळे आपण प्रचंड दहशतीत आलो. त्यामुळे तक्रार करण्यास धजावले नाही. कुणाकडे अत्याचाराची तक्रारदेखील केली नाही. मात्र, आता सहनशक्तीच्या पलीकडे गेल्याने तक्रार नोंदवत असल्याचे पीडिताने म्हटले आहे. पती व आरोपी सै. नसिमविरूद्ध कायदेशीर कारवाई व्हावी, अशी आर्जव तिने पोलिसांकडे केली आहे.
पीडिताच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला. दोन्ही आरोपींना तातडीने अटक केली. न्यायालयाने दोघांनाही तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अमूल बच्छाव, ठाणेदार, येवदा