पतींनी केली पत्नींची पाद्यपूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2016 12:26 AM2016-03-10T00:26:27+5:302016-03-10T00:26:27+5:30

युवा स्वाभिमान संघटनेद्वारे मंगळवारी अनोखा जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. नजीकच्या पिंपळखुटा येथे आयजित या अभिनव कार्यक्रमात पतींनी ...

Husband's wife's pagan worship | पतींनी केली पत्नींची पाद्यपूजा

पतींनी केली पत्नींची पाद्यपूजा

Next

अमरावती : युवा स्वाभिमान संघटनेद्वारे मंगळवारी अनोखा जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. नजीकच्या पिंपळखुटा येथे आयजित या अभिनव कार्यक्रमात पतींनी आपआपल्या पत्नीची पाद्यपूजा केली तर पित्यांनी कन्यापूजन करुन जागतिक महिला दिन साजरा केला. युवा स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितू दुधाने यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात १५१ जोडप्यांनी सहभाग घेतला. समाजाची महिलांबद्दलची मानसिकता बदलण्यासाठी हा उपक्रम असल्याचे दुधाने यांनी सांगितले. पिंपळखुट्याच्या सरपंच अर्चना डोईफोडे, वनमाला तिडके, रुपाली दंदे, वंदना लुटे, हिराबाई अर्मळ, अंजली अर्मळ उपस्थित होत्या. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’चा नारा देण्यात आला. प्रास्ताविक उपसरपंच धर्मपाल डोंगरे तर संचालन अशोक सरदार यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Husband's wife's pagan worship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.