हवाला रकमेचे ‘हैद्राबाद’ कनेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:13 AM2021-07-30T04:13:55+5:302021-07-30T04:13:55+5:30

प्रदीप भाकरे अमरावती : स्थानिक राजापेठ पोलिसांनी ‘कोम्बिंग ऑपरेशन’दरम्यान जप्त केलेल्या ३.५० कोटींच्या व्यवहाराचे ‘स्ट्रॉंग कनेक्शन’ उघड झाल्यानंतर ‘हैद्राबाद ...

‘Hyderabad’ connection of hawala amount | हवाला रकमेचे ‘हैद्राबाद’ कनेक्शन

हवाला रकमेचे ‘हैद्राबाद’ कनेक्शन

Next

प्रदीप भाकरे

अमरावती : स्थानिक राजापेठ पोलिसांनी ‘कोम्बिंग ऑपरेशन’दरम्यान जप्त केलेल्या ३.५० कोटींच्या व्यवहाराचे ‘स्ट्रॉंग कनेक्शन’ उघड झाल्यानंतर ‘हैद्राबाद कनेक्शन’देखील पोलीस दप्तरी नोंदविले गेले. गुरुवारी हैद्राबाद पोलिसांकडून याबाबत राजापेठ पोलिसांना विस्तृत ‘टेलिफोनिक’ विचारणा करण्यात आली. अमरावतीमध्ये पकडल्या गेलेल्या हवाला रकमेशी संबंधित अहमदाबादेतील व्यक्ती ही हैद्राबाद येथे पकडण्यात आलेल्या हवाला कांडाशी संलग्न असल्याची माहिती पलीकडून देण्यात आली. त्यामुळे की काय, पोलिसांनाहीदेखील आयकर विभागासह ‘पॅरेलल’ तपासाची परवानगी मागणारा अर्ज न्यायालयात सादर केला आहे.

सूत्रांनुसार, १५ सप्टेंबर २०२० मध्ये हैद्राबाद पोलिसांनी बंजारा हिल्स भागात दोन वाहनांमधून ३.७५ कोटी रुपये जप्त केले होते. त्यावेळी चार जणांना ताब्यात घेण्यात आले होते. रकमेची वाहतूक आपण कमलेश शहा यांच्या सूचनेनुसार करीत होतो, अशी कबुली त्या चौघांनी दिली होती. अटकेतील आरोपी हे अहमदाबाद येथील कमलेश शहा यांच्या मुंबई स्थित बंजारा हिल्स शाखेचे कर्मचारी असल्याचे तेथील हैद्राबादचे पोलीस आयुक्त अंजनीकुमार यांनी स्पष्ट केले होते. त्यावेळी आरोपींचा बाॅस म्हणून कमलेश शहा यांचे नाव उघड झाले होते. अमरावतीत पकडली गेलेली रक्कमदेखील अहमदाबाद येथील कमलेश शहा यांनी आपलीच असल्याचा दावा केल्याची माहिती राजापेठ पोलिसांनी दिली. दरम्यान, राजापेठ पोलिसांना जे पत्र देण्यात आले, त्यात ती रक्कम नीना कमलेश शहा यांच्या प्रोप्रायटर फर्मची असल्याचे म्हटले आहे.

हैद्राबाद व अमरावतीमध्ये जप्त कोट्यवधीच्या प्रकरणात कमलेश शहा हे नाव ‘कॉमन’ आहे. सबब, अमरावती पोलीस त्याबाबत हैद्राबाद पोलिसांकडून दहा महिन्यांपूर्वीची माहिती मागविणार आहे.

दहशतवादी कारवायात हवालाचा पैसा?

मुंबईत जुलै २००७ मध्ये झालेला बॉम्बस्फोट, गुजरातमधील २००८ मध्ये झालेले बॉम्बस्फोट आणि पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटासाठी दहशतवाद्यांना हवालामार्फत पैसा पुरवण्यात आल्याचे सुरक्षा यंत्रणांच्या तपासात समोर आले होते. दहशतवादविरोधी पथकाकडून सन २०१४ मध्ये दहशतवादी कारवायांसंदर्भात सुरू असलेल्या तपासात, मुंबईतील २००७ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटासाठी हवालामार्फत दहशतवाद्यांना पैसा आल्याची माहिती मिळाली होती. गुटखा व्यावसायिकांच्या माध्यमातून हा हवाला चालत असल्याचेही आढळून आले होते.

काय आहे हवाला?

हवाला म्हणजे सोप्या शब्दात गॅरंटी! जेव्हा हा शब्द आर्थिक व्यवहारात वापरला जातो तेव्हा 'हवाला' म्हणजे एक पैसे देण्याघेण्याची व्यवस्था आणि हे प्रकरण केवळ विश्वासाच्या अलिखित करारावर चालते. फार पूर्वी जेव्हा बँका अस्तित्वात नव्हत्या, आधुनिक करप्रणाली अस्तित्वात नव्हती तेव्हा हवाला राजमान्य होता. त्यानंतर पेढ्यांमध्ये हुंडीवर पैसे मिळण्याची सोय झाली. त्यानंतर हवाला आपोआप बेकायदेशीर झाला.

Web Title: ‘Hyderabad’ connection of hawala amount

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.