डफरीनमध्ये हय़ुमन मिल्क बँक
By admin | Published: June 3, 2014 11:42 PM2014-06-03T23:42:36+5:302014-06-03T23:42:36+5:30
बाळ-बाळंतिणीला दुधाची कमतरता भासल्यास घाबरण्याचे कारण नाही. येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात ‘ह्युमन मिल्क बँक’ तयार करण्याचा प्रस्ताव शासनाकडे विचाराधिन आहे. या प्रस्तावाला शासनाकडून मंजुरात
शासनाकडे प्रस्ताव विचाराधीन : अधीक्षकांकडून पाठपुरावा
वैभव बाबरेकर - अमरावती
बाळ-बाळंतिणीला दुधाची कमतरता भासल्यास घाबरण्याचे कारण नाही. येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात ‘ह्युमन मिल्क बँक’ तयार करण्याचा प्रस्ताव शासनाकडे विचाराधिन आहे. या प्रस्तावाला शासनाकडून मंजुरात मिळाल्यास ग्रामीण भागातून येथे दाखल होणार्या व दुधाची कमतरता जाणवणार्या बाळंतणीच्या बाळाला मातेच्या दुधाची चव आणि पौष्टिक दूध मिळणार आहे.
महाराष्ट्रात पुणे येथे ससून हॉस्पिटल व मुंबई येथे सायन हॉस्पिटल या दोन ठिकाणी ‘ह्युमन मिल्क बॅक’ आहे. विदर्भात येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात ही बँक सुरु व्हावी यासाठी जिल्हा स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक अरुण यादव यांनी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला असून या प्रस्तावाला मंजुरात मिळण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. ज्या प्रसुत महिलांमध्ये दुधात कमतरता आहे तसेच काही बालकांच्या माता प्रसूतीदरम्यान दगावतात, अशांसाठी ‘ह्युमन मिल्क बँके’तील दूध उपयोगी पडणार आहे. जिल्ह्यातील अनेक महिला प्रसूतीनंतर आपल्या बाळांना दूध पाजण्यापासून वंचित राहत आहे. तसेच अनेक बाळांच्या माता प्रसूतीदरम्यान दगावल्या आहेत. अशा शेकडो माता व बाळांना ह्युमन मिल्क बॅकेचा मोठा आधार मिळणार आहे. ही बँॅक लवकरच सुरु करण्यासाठी जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक अरुण यादव यांनी पाठपुरावा सुरु केला आहे. विदर्भातील महिलांकरिता ही बँके महत्त्वाची व उपयुक्त ठरणार आहे. ही बॅक सुरु झाल्यास दुध पाश्चराईज्ड करणारी मशीन रुग्णालयाला मिळणार आहे. त्यामुळे विदर्भातील बालमृत्यूचे प्रमाणही घटणार आहे.