शिक्षकांची नोकरी नको रे बाबा;डीएडकडे विद्यार्थ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:14 AM2021-09-11T04:14:54+5:302021-09-11T04:14:54+5:30

५०० हून अधिक जागांसाठी ३७० अर्ज; अन्य अभ्यासक्रमाला पसंती अमरावती: ना नोकरीची हमी ना टीईटी या सीईटीचे निश्चित वेळापत्रक ...

I don't want a job as a teacher | शिक्षकांची नोकरी नको रे बाबा;डीएडकडे विद्यार्थ्यांची पाठ

शिक्षकांची नोकरी नको रे बाबा;डीएडकडे विद्यार्थ्यांची पाठ

googlenewsNext

५०० हून अधिक जागांसाठी ३७० अर्ज; अन्य अभ्यासक्रमाला पसंती

अमरावती: ना नोकरीची हमी ना टीईटी या सीईटीचे निश्चित वेळापत्रक यासह विविध कारणांमुळे विद्यार्थ्यानी डीएड(डीटीएड)अभ्यासक्रमाकडे पाठफिरविल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात ४० महाविद्यालय होते.त्यापैकी आजघडीला २१ डीएड महाविद्यालय सुरू असले तरी १० महाविद्याला डीएड अभ्यासक्रमाला विद्यार्थ्याचा कल दिसून येत आहे.या महाविद्यालयामध्ये जवळपास ५०० हून अधिक जागा आहेत.या जागाकरीता ३७० विद्यार्थ्याचे अर्ज ऑनलाईंन प्राप्त झाले आहेत.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून राज्यभर शिक्षणशास्त्र पदविका अभ्यासक्रम चालविला जातो.या अभ्यासक्रमाला आधी डीएड (ङिप्लोमा इन एज्युकेशन)नंतर डीटीएड (डिप्लोमा इन टीचर एज्युकेशन) आता डीएलएड(डिप्लोमा इन इलिमेंटी एज्युकेशन) या नावाने ओळखले जाते.दोन वर्षाच्या या अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर आधी नोकारीची हमखास हमी होती.आधी दहावीच्या आणि नंतर बाराचीच्या निकालानंतर डीएडच्या अभ्यासक्रमाला निवड होण्यासाठी फेरी पध्दत वापरली जायची त्या फेरीतून निवड झालेल्या अध्यापक विद्यालयात प्रवेश निश्चित केला जात होता.मात्र मागील काही वर्षात विविध कारणांमुळे डीएडच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यानी पाठ फिरविली असल्याचे दिसून येते.जिल्ह्यात २१ महाविद्यालय आहेत.यात ५०० पेक्षा जास्त जागा आहेत.आतापर्यत ३७० विद्यार्थ्याचे ऑनलाईन अर्ज डीएड अभ्यासक्रमासाठी आले आहेत. एकेवेळी या अभ्यासक्रमासाठी स्पर्धा असलेल्या या अभ्यासक्रमासंदर्भात आता कोणीही या अन प्रवेश घ्या अशी स्थिती झाली आहे.

बॉक्स

डीएड अभ्यासक्रमाकडे का फिरविली जातेय पाठ ?

शिक्षक भरतीवरील मर्यादा

खासगी संस्थांच्या शाळांमधील डोनेशन पध्दती

सीईटी व टीईटीची परीक्षा वेळखाऊ

यापूर्वी बेरोजगाराची फौज

नाेकरीची हमी नसणे

बॉक्स

म्हणूृन इतर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला

कोट

डीएड अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरीची कोणतीही कमी नाही.अगोदरच डीएड झालेले अनेक उमेदवार बेरोजगार आहेत.त्यामुळे डीएड अभ्यासक्रमाला प्रवेश न घेता इंजिनिअरिंग क्षेत्राकडे वळलो आहे.

प्रणय कावरे

विद्यार्थी

कोट

कधीकाळी डीएडनंतर शिक्षकांची हमखास नोकरी मिळायची त्यामुळे या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळावा याकरीता मोठी स्पर्धा होती.आता तशी परिस्थिती नाही.मी.आयटीआयला प्रवेश घेतला आहे.

कांचन उके

विद्यार्थीनी

बाॅक्स

अनेक अडचणी

डी.एड.अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यानी पाठ फिरविल्याने खासगी कॉलेज अडचणीत सापडले आहेत.प्राध्यापक,कर्मचाऱ्यांचे वेतन करणे यासह महाविद्यालय चालविणे जिकरीचे ठरत आहेत.

बॉक्स

जिल्ह्यातील एकूण डी.एड.कॉलेज २१

एकूण जागा -५००

अर्ज-३७०

Web Title: I don't want a job as a teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.