मी भारतात आलोय, ३ लाख ३२ हजार हवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 10:45 PM2017-11-19T22:45:55+5:302017-11-19T22:50:18+5:30
अफगाणमधून येणारी व्यक्ती भारतात दाखल झाली. तिने ३ लाख ३२ हजार रुपये मागितले.
आॅनलाईन लोकमत
नेरपिंगळाई : अफगाणमधून येणारी व्यक्ती भारतात दाखल झाली. तिने ३ लाख ३२ हजार रुपये मागितले. पैशांसाठी थोडा वेळ वाट पहावी लागेल. सध्या माझ्याकडे पैसे नाही, असे सांगताच त्या व्यक्तीने संवाद संपविला.
अफगाणिस्तानात कमाविलेले पैसे तुमच्याजवळ ठेवण्यासाठी त्यातील ३० टक्के रक्कम देणार असल्याचे सांगताना दिवाकर यांची माहिती संबंधित व्यक्तीने मागितली. दिवाकर यांनी त्याप्रमाणे माहिती पाठविली. त्यानंतर पाच दिवसांनी लोरी हॅरिस हिचे पुन्हा उत्तरार्थ मॅसेज आले. ती म्हणाली, ‘तुम्ही मला ताबडतोब रिप्लाय दिला. त्यामुळे माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास जडला आहे. मी तुमच्या प्रेमातच पडले आहे. त्यामुळे मी पार्सल पाठवित आहे. माझी अफगाणिस्तानातील तालीबानविरोधी ड्युटी संपल्यानंतर पुढील महिन्यात मी तुमच्याकडे येईल. माझे तुमच्यावर प्रेम जडल्यामुळे आपण सोबतच राहू. मी तुमच्या मिठीतच राहील. मी तुमचे किस घेईल. आय लव्ह यू. तुम्हाला मी माझ्या कुटुंबाचा दर्जा देईल. मी लवकरच पार्सल तुमच्याकडे पाठवित असून, पार्सल सोडविण्याचा तसेच परराष्टÑीय व्यवहाराचा खर्च मात्र तेवढा द्यावा लागेल.’
लगेच १६ नोव्हेंबरला दुसऱ्या मॅसेजसोबत पार्सलचा फोटो पाठविण्यात आला. ‘माझा प्रतिनिधी जेरी मॉरिसन असून, तो १६ नोव्हेंबरला पार्सल घेऊन निघाला. १८ नोव्हेंबरला भारतात दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचेल. तो प्रतिनिधी तेथून दिवाकर यांच्याशी संपर्क साधेल आणि तो ज्या काही सूचना देईल, त्या सूचना दिवाकर यांना पाळाव्या लागतील तसेच पार्सलकरिता दुबई व भारतात जो खर्च येईल, तो खर्च दिवाकर यांना भरावा लागेल. पैसे भरल्यानंतर पार्सल आपल्या घरी प्रतिनिधीद्वारे पोहोचते करण्यात येईल. पार्सल उघडण्याकरिता आपणास एक पीन कोड सुद्धा देण्यात येईल.’ या ु्प्करणात दिवाकरला पैसे मिळणार असले तरी त्याला प्रथम शुल्करूपाने पैसे द्यावे लागणार होते.
सावध राहा
फसवणूक करणारे गुन्हेगार कुठल्याही विदेशी महिला नसून आपल्याच भारतातील ते असावेत व विदेशी महिलांच्या मुखवट्याआड ते असे फसवणुकीचे गुन्हे करीत असावेत, असा संशय व्यक्त होत आहे. या घटनांमधील बातमीमध्ये आपल्या येथील दादाराव, साहेबराव व दिवाकर ही नावे जरी काल्पनिक असली तरी या घटना सत्य आहेत.