सहा महिन्यांपासून लेकराची भेट नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:13 AM2021-05-12T04:13:16+5:302021-05-12T04:13:16+5:30

पान २ ची बॉटम फोटो पी ११ धारणी धारणी : घरी सहा महिन्यांची चिमुकली; पण कोरोना साथीमुळे तिची महिनोनमहिने ...

I haven't seen Laker in six months! | सहा महिन्यांपासून लेकराची भेट नाही!

सहा महिन्यांपासून लेकराची भेट नाही!

Next

पान २ ची बॉटम

फोटो पी ११ धारणी

धारणी : घरी सहा महिन्यांची चिमुकली; पण कोरोना साथीमुळे तिची महिनोनमहिने भेट नाही. कुटुंबीयांशी संवाद होतो व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून. मात्र, साथीचे गांभीर्य लक्षात घेऊन राजेंद्र चकुले यांनी रुग्णसेवेत खंड पडू दिला नाही. मोगर्दाच्या उपकेंद्रातील या आरोग्यसेवकाची ही निरंतर सेवा पाहून धारणीच्या प्रकल्प अधिकारी मिताली सेठी यांनाही गहिवरून आले.

राजेंद्र चकुले हे मुलीच्या जन्मानंतर एकदाच घरी जाऊ शकले व त्यांना तिला पाहता आले. त्यानंतर पुढील सहा महिने त्यांचा कुटुंबीयांशी केवळ व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संवाद झाला. प्रकल्प अधिकारी सेठी यांनी नुकतीच कोविड केअर सेंटरला भेट दिली असता, त्यांना ही माहिती मिळाली. गत आठवड्यात कोविड केअर सेंटरला सेठी पोहोचल्या असता, तेथील एका रुग्णाचा चकुले यांच्याशी वाद झाल्याचे त्यांना आढळले. आपल्याला घरी जायला परवानगी मिळावी, असे रुग्णाचे म्हणणे होते, तर आणखी काही दिवस रुग्णाला सेंटरमध्ये थांबण्याचा चकुले यांचा आग्रह होता.

कोरोनाग्रस्ताची जोखीम पुरेशी कमी झालेली नाही. या रुग्णाला घरी सोडण्याबाबत इतरांचेही फोन आले. मात्र, मी सगळ्यांना साफ नकार दिला. कोणाचाही फोन येवो, रुग्णाची उपचार कालावधी संपल्याशिवाय व प्रकृतीत सुधारणा झाल्याशिवाय मी त्याला सोडणार नाही. ती माझी जबाबदारी आहे, असे चकुले यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी जोखमीच्या ठिकाणी काम करीत असल्याने कुटुंबाला व चिमुकलीला संसर्ग होऊ नये म्हणून घरी जात नसल्याचे सांगताना चकुले यांचे डोळे पाणावले. प्रकल्प अधिकाऱ्यांनी या घटनेचा आपल्या फेसबूकवरील लेखनात विशेष उल्लेख केला.

हे देखील आहेत कार्यरत

धारणी येथे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. विकास गवई हेदेखील अविरत सेवा देत आहेत. त्यांचाही कौतुकास्पद उल्लेख प्रकल्प अधिकाऱ्यांनी केला. आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी जिवावर उदार होऊन खंबीरपणे अविरत रुग्णसेवा देत आहेत. त्यांना प्रोत्साहनाची गरज आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच कोरोनावर मात करता येईल, असे सेठी यांनी सांगितले.

Web Title: I haven't seen Laker in six months!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.