मी मुख्यमंत्र्यांना गाडगेबाबांच्या रुपात पाहतो
By admin | Published: May 9, 2016 12:02 AM2016-05-09T00:02:37+5:302016-05-09T00:02:37+5:30
तहानलेल्यांना पाणी भुकेल्यांना अन्न, बेरोजगारांना रोजगार, बेघरांना घरे ही गाडगेबाबांची सूत्र होती.
पालकमंत्री : जिल्ह्यात सिंचनाची सुविधा
अमरावती : तहानलेल्यांना पाणी भुकेल्यांना अन्न, बेरोजगारांना रोजगार, बेघरांना घरे ही गाडगेबाबांची सूत्र होती. त्यांचे विचार व आदर्श मुख्यमंत्र्यांनी डोळ्यासमोर ठेवून तहानल्यांना पाणी देण्यासाठी जलयुक्त शिवार योजना सुरू केली. अन्न देण्यासाठी अन्न सुरक्षा ही योजना महत्त्वाची असली तरी सर्वांसाठी घरे यातूनही अनेकांना घरे मिळणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गाडगेबाबांचे स्वप्न कृतीत उतरवीत असून त्यांना मी गाडगेबाबांच्या रुपात पाहतो, असे मौलिक प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.
पुढे बोलताना ते म्हणाले, अमरावती जिल्ह्यात २२ हजार हेक्टर संरक्षित सिंचन मिळाले आहे. २५३ गावात जलयुक्त अभियानाची कामे झाली असून लवकरच अमरावती जिल्हा सिंचनमय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कौशल्य विकास योजना आणली यामुळे अनेक युवकांना बळ मिळाले. १७५ कोटी रुपये सर्वांसाठी घरे या योजनेसाठी प्रस्तावित आहे. २०२२ पर्यंत अमरावती जिल्ह्यात एकही व्यक्ती बेघर राहाणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी केले पालकमंत्री,
जिल्हाधिकाऱ्यांचे कौतुक
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पालकमंत्री मानधन योजनेतून रस्ते झाले. जलयुक्त शिवार अंतर्गत जास्तीत जास्त शेततळे झाले. याचे श्रेय पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना जाते. त्यांना मला सांगावेशे वाटते की, शेतातील पाणी शेतातच मुरले पाहिजे, पावसामुळे शेती वाहून जाते शेती वाचविण्यासाठी बांधबंदिस्ती महत्त्वाची असून बांधबंदिस्तीवर अधिक भर दिल्यास परिस्थिती निश्चित बदलेल, असा आशावाद व्यक्त केला. (प्रतिनिधी)