आय लव यू; तेरा फोटो देखके दिल आ गया है! बँक मॅनेजर महिलेला व्हाईस मेसेज
By प्रदीप भाकरे | Published: April 15, 2023 08:36 AM2023-04-15T08:36:28+5:302023-04-15T08:37:17+5:30
'आय लव यू, तेरा फोटो देखके तेरेपे दिल आया है, जानेमन पैसा मत दे, सिर्फ एक बार तेरे साथ खाना खाना चाहता हूँ' असा व्हाईस मेसेज टाकून एका बँक सहव्यवस्थापक महिलेचा विनयभंग करण्यात आला.
अमरावती :
'आय लव यू, तेरा फोटो देखके तेरेपे दिल आया है, जानेमन पैसा मत दे, सिर्फ एक बार तेरे साथ खाना खाना चाहता हूँ' असा व्हाईस मेसेज टाकून एका बँक सहव्यवस्थापक महिलेचा विनयभंग करण्यात आला. ७ एप्रिल रोजी ४:२० ते ५:४२ दरम्यान तिला एकूण आठ व्हाईस मेसेज करण्यात आले. त्यात तिला अश्लील शिवीगाळदेखील करण्यात आली. याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी आरोपी राजेश मिश्रा (रा. ठाणे) याच्याविरोधात १३ एप्रिल रोजी रात्री ९ च्या सुमारास गुन्हा दाखल केला.
येथील एका बँकेत सहव्यवस्थापक असलेल्या महिलेकडे बँक शाखांच्या नूतनीकरणाची जबाबदारी आहे. अशाच एका बँक शाखेच्या नूतनीकरणाचे काम ठाणे येथील एका कंपनीकडे असून, त्या कंपनीचा प्रतिनिधी म्हणून आरोपी राजेश मिश्रा काम पाहतो. त्या फर्मचा प्रतिनिधी म्हणून या महिला व्यवस्थापकाची त्याच्यासोबत ओळख झाली. त्यातून त्याने ७ एप्रिल रोजी तिला व्हाईस मेसेज पाठविला.
अन्य दुसऱ्यालाही पाठविला मेसेज
आरोपी राजेश मिश्रा एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने त्या बँकर महिलेच्या सहकाऱ्याच्या व्हॉट्सअॅपवर त्याच दिवशी सायंकाळी ६:४१ ते ६:४४ दरम्यान व्हाईस मेसेज पाठविला. त्यात महिलेसह तिचा अन्य एक सहकारी गायब असल्याने काम कसे करायचे, ते समजत नसल्याचे म्हटले. असे काम करून दाखवेल की, तुम्ही विचार करू शकणार नाही, असे म्हणत बँकर महिलेशी एक मीटिंग करवून द्या, तिला एकटीला एकदा पाठवा, असे तो व्हाईस मेसेजमधून म्हणाला. यातून आरोपीने आपल्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी व्हाईस मेसेज पाठविल्याची महिला बँकरची खात्री पटली. तिने ती बाब तिच्या वरिष्ठांना सांगितली.
तो वृद्ध इंजिनिअर आणखी पाच- दहा वर्षे जिवंत राहील, पण तुझा फोटो मेसेज आरोपीने डिलिट करण्यापूर्वी पाहून माझे मन तुझ्यावर आले आहे, आपल्या मित्राला पाठविले, तर असे त्यात नमूद होते. ते एकूण आठ थोड्याच वेळात आरोपीने ते मेसेज व्हाईस मेसेज ऐकताच महिलेने ते डिलिट केले.