माझे मतदानच चुकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 10:39 PM2018-03-11T22:39:55+5:302018-03-11T22:39:55+5:30
आॅनलाईन लोकमत
अमरावती : ‘लाटेवर स्वार होऊन मी मतदान केले. परंतु, महाराष्ट्राची होत असलेली अधोगती पाहून माझे मतदान चुकले, अशी भावाना मतदार व्यक्त करीत आहेत’ शिवसेना उपशहरप्रमुख अमोल निस्ताने यांच्या नेतृत्वात शासनाच्या धोरणाविरोधात जनभावना व्यक्त करणारे अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदन सादर करण्यात आले.
विद्यमान भाजप सरकारच्या कार्यकाळात कृषिक्षेत्र पिछाडीवर आले. राजगार निर्मिती कागदावरच राहिली. शेतकरी आत्महत्या, व्यापार, आरक्षण, महिलांचे प्रश्न या मुद्यावर शासनाने काहीही केले नाही. त्यामुळे सत्तापक्षाला मतदान करून चूक तर नाही ना! ही जनभावना शिवसेना उपशहरप्रमुख अमोल निस्ताने यांनी पाठीवर सरकारच्या अपयशाची वृतपत्रीय कात्रणे चिकटवून यावेळी व्यक्त केली.
मी चुकलो, सावध व्हा! असा संदेश देत अमोल निस्ताने यांनी जिल्हाधिकाºयांनमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे. यावेळी आंदोलनात अमोल निस्ताने, मोहन क्षीरसागर, संजय देशमुख, संजय बुंदिले, चंकी तिवारी, राजेश बागडे, शैलेंद्र डहाके, अरूण सारसर, शुभम तंबोले, ब्रिजेश गुप्ता, गौरव गवळी, पिंटू चावरे, पंकज कुमरे, विक्की उईके, छोटू इंगोले, गोपाल ढोक, अमित चुंबळे प्रफुल्ल तोडाशे, तुषार वार्इंदेशकर, संतोष भाकरे, प्रशांत गजभिये आदी उपस्थित होते.