मेरे पास सिर्फ माँ है!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:11 AM2021-06-04T04:11:19+5:302021-06-04T04:11:19+5:30
अमरावती: कोरोनामुळे आईवडिलांचे छत्र हरपल्याने अनाथ झालेल्या बालकांच्या नावावर एकरकमी पाच लाख रुपयांची मुदत ठेव ठेवली जाईल, तसेच बालक ...
अमरावती: कोरोनामुळे आईवडिलांचे छत्र हरपल्याने अनाथ झालेल्या बालकांच्या नावावर एकरकमी पाच लाख रुपयांची मुदत ठेव ठेवली जाईल, तसेच बालक सक्षम होईपर्यंत त्याचा बालसंगोपन योजनेतून खर्च उचलण्यात येईल, असा निर्णय राज्य मंत्रीमंडळाने घेतला. त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे.
ही योजना वा निर्णय दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी आहे. मात्र, ज्यांनी केवळ वडील गमावले, त्या पाल्यांची , त्या कुटुंबाचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्ता ‘बापमाणूस’ गमावल्याने ६२ बालकांवर ‘मेरे पास सिर्फ माँ है’ अशी उद्वीग्न करणारी परिस्थिती येऊन ठेपली आहे. आजही अनेक शेतकरी, शेतमजुर व खासगी काम करणाºया कुटुंबाचा कर्ता पुरूषच आहे. त्यामुळे पितृछत्र गमावलेल्या आमच्या कुटुंबाकडे सरकार लक्ष देईल का, की आमच्या मातेलाच हाडाची काडे करून आमची उपजिविका भागवावी लागेल, अशी सामुहिक आर्जव ते शासन प्रशासनाकडे करीत आहेत. कोरोनाने एक पालक गमावलेल्या बालकांची राज्यातील संख्या ५०९६ च्या घरात आहे. यामध्ये पितृछत्र हरवलेल्या मुलांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे केवळ
------------
बॉक्स
जिल्ह्यात क ोरोनाचे एकूण रूग्ण : ९३, १६८
बरे झालेले रूग्ण : ८७, ६४०
सध्या उपचार सुरू असलेले: १२७२
एकूण मृत्यू : १४७७
------------
सात जणांनी आईवडिलांचे छत्र गमावले
कोरोनाच्या दुसºया लाटेत सर्वाधिक मृत्यू झाले. तर आतापर्यंत सात बालक आईवडिलांच्या कोरोनामुळे झालेल्या मृत्यूने अनाथ झालेत.जिल्ह्यात ६२ बालकांनी पितृछत्र गमावले. तर १६ बालक ंंआईविना पोरके झाले.
---------------
बॉक्स १
शेतमजुरीशिवाय काहीच नाही
वडिल कोरोनामुळे गेले. संपुर्ण कुटुंबाची भिस्त बाबांवर, ते कामावर गेले, तर चुल पेटणार. पण कोरोनाने आमचे जगच हरविले. आता आईसह आम्हालाही शेतमजुरी करण्याशिवाय पर्याय नाही. लॉकडाऊनमुळे शेतमजुरीलाही मर्यादा आल्या. त्यामुळे आता पित्याविना सर्व जबाबदारी आईवर आली. सरकारने आम्हालाही मदत करावी, अशी प्रतिक्रिया कोरोणामुळे पिता गमावलेल्या बालकाने दिली.
----------
आभाळच फाटले, कुठे शिवायचे?
माझे आईवडील एकाचवेळी कोरोनाबाधित झाले. दोघांवर एकाचवेळी उपचार सुरू असताना वडिलांचे निधन झाले. घरी मी एकटाच. वडील गेल्याचे आईला डिस्चार्जनंतर सांगितले. पित्याच्या अकाली निधनाने आभाळच फाटले. मात्र, काय जगावेच तर, लागणारच. आईला घेऊन झगडतो आहे, जगतो आहे. शासन प्रशासनाने मदत केली. तर उत्तमच. जगणे सुकर होईल, अशा आशावाद एका बालकाने व्यक्त केला.
---------
आता कुटुंबासोबत शेती
पितृछत्र हरपल्याने आता आईसोबत घरी असलेली अत्यल्प शेती करण्याशिवाय पर्याय नाही. शिकण्याच्या वयात आता आईला, घराला आधार देण्याची बिकट स्थिती येऊन ठेपली आहे. काही ंसामाजिक संघटनांनी मदतीचे आश्वासन दिले आहे. ते केव्हा पुर्ण ैहोईलल माहित नाही, पण सध्या दोन वेळच्या जेवनाची सोय शेती कसूनच होईल. सरकारने आम्हा बाप गमावलेल्यांनाही मदत करावी.
--