मला मुख्यमंत्र्यांनी पाठविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 10:17 PM2018-09-02T22:17:32+5:302018-09-02T22:18:09+5:30
मला अमरावतीत मुख्यमंत्र्यांनी पाठविले. मी दूत म्हणून आलोय. आ. रवि राणा हे मुख्यमंत्र्यांचे चांगले मित्र आहे. त्यांची विकासासाठी धडपड खरेच कौतुकास्पद असून, त्यांना मुख्यमंत्र्यांनी भरभरून निधी दिला आहे. मीदेखील दोन कोटींचा निधी देत असल्याची घोषणा राज्याचे सामाजिक न्याय व अल्पसंख्याक राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी रविवारी येथे केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मला अमरावतीत मुख्यमंत्र्यांनी पाठविले. मी दूत म्हणून आलोय. आ. रवि राणा हे मुख्यमंत्र्यांचे चांगले मित्र आहे. त्यांची विकासासाठी धडपड खरेच कौतुकास्पद असून, त्यांना मुख्यमंत्र्यांनी भरभरून निधी दिला आहे. मीदेखील दोन कोटींचा निधी देत असल्याची घोषणा राज्याचे सामाजिक न्याय व अल्पसंख्याक राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी रविवारी येथे केली.
येथील कल्याणनगरात विविध विकासकामांच्या भूमिपूजनाप्रसंगी ना. कांबळे बोलत होते. आ. राणांच्या विकासकामांचा आलेख मांडला. मतदारसंघात मागास वस्त्यांमध्ये नाल्या, रस्ते, समाजभवन, शादीखाना, स्मशानभूमिचे बांधकामे आदींना त्यांनी प्राधान्य दिले. बडनेरा मतदारसंघातील गरीब, सामान्य कुटुंबीयांसोबत त्यांचे आपुलकीचे स्नेह आहे. आ. राणांच्या आग्रहाखातर स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात कोंडेश्र्वर देवस्थानसाठी २५ कोटी, राजापेठ उड्डाणपुलासाठी ३० कोटी व ऋणमोचन देवस्थानसाठी १२ कोटींचा निधी मंजूर केल्याचे ना.दिलीप कांबळे म्हणाले. यावेळी उपस्थितांमधून टाळांच्या कडकडाटाने आ. राणांवर कौतुकाचा वर्षाव झाला. मंचावर नवनीत राणा, प्रबोधनकार सत्यपाल महाराज, नीळकंठ कात्रे, बाबासाहेब शिरभाते, अजय गाडे, दादाराव महल्ले, रॉय काका, जयश्री मोरय्या, गजानन बोंडे, जयंतराव वानखडे, गणेशदास गायकवाड, रूपेश खडसे, संजय हिंगासपुरे, सुमती ढोके, सपना ठाकूर आदी उपस्थित होते.
विरोधकांनो, सोशल मीडियाच्या बाहेर पडा - रवि राणा
भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने आ. रवि राणा यांनी विरोधकांवर ताशेरे ओढताना नागरिकांची प्रामाणिकपणे कामे करा. व्हॉट्सअप, फेसबूक सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात संभ्रम निर्माण न करता प्रभागात विकासकामे करा, असा मौलिक सल्ला त्यांनी दिला. छत्रीतलाव परिसराचा विकास करण्यापासून मला कुणीही रोखू शकणार नाही, असा थेट प्रहार आ. राणांनी विरोधकांवर केला.
निराधार योजनेचा लाभ दोन हजार रूपये द्या
शासनाच्या संजय गांधी निराधार, श्रावण बाळ निराधार योजनेतील लाभार्थ्यांना मिळणारे ६०० ऐवजी दोन हजार रूपये अनुदान देण्याची मागणी युवा स्वाभिमान संघटनेच्या मार्गदर्शक नवनीत राणा यांनी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्याकडे केली. विधवा, परितक्ता, अपंगांना न्याय देण्याविषयीची भूमिका नवनीत राणा यांनी मांडली.