कार्यालयात चष्मा काढून यायचं !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:22 AM2021-02-06T04:22:47+5:302021-02-06T04:22:47+5:30
पान ३ ची बॉटम अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील हंतोडा येथील वडिलांच्या नावे असलेल्या रेशन दुकानासंबंधी गेलेल्या कार्यकर्त्याला स्थानिक तहसील ...
पान ३ ची बॉटम
अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील हंतोडा येथील वडिलांच्या नावे असलेल्या रेशन दुकानासंबंधी गेलेल्या कार्यकर्त्याला स्थानिक तहसील कार्यालयातील लिपिक महिलेने कानपिचक्या दिल्यामुळे कार्यकर्त्याने संतप्त होऊन अपमानास्पद वागणूक मिळाल्याची लेखी तक्रार तहसीलदारांकडे केली. कार्यालयात चष्मा काढून येण्याची तंबी त्या महिलेने आपल्याला दिल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
घटनेची हकीकत अशी की, हंतोडा येथील अनेक गावकऱ्यांच्या शिधापत्रिकांचे काम दोन वर्षांपासून थंडबस्त्यात आहे. ज्या ‘डी १’ रजिस्टरमध्ये शिधापत्रिकाधारक गावकऱ्यांचे रेशनकार्ड आणि आधारकार्डची नोंद असते, ते रजिस्टर १५ वर्षांपासून अत्यंत जीर्ण अवस्थेत पडले आहेत. त्यामुळे त्यावरील आधार क्रमांक आणि रेशनकार्ड क्रमांकाच्या नोंदी गहाळ झाल्या आहेत. तालुक्यातील अनेक रेशन कार्डधारकांच्या नोंदी/दुरुस्त्या व नूतनीकरण रजिस्टर बाइंडिंग करून सुस्थितीत आणणे प्रस्तावित आहे. पण, त्यामुळे गहाळ झालेली नोंद प्राप्त होणे मुश्कील आहे. दरम्यान याच कामासाठी वडिलांची प्रकृती बरी नसल्याने तो कार्यकर्ता तहसील कार्यालयात आला होता आणि समस्या मांडली. पण, लिपिक महिलेने अपमान केला, असे कार्यकर्त्याचे म्हणणे आहे. विभागप्रमुख भोवते यांना याबाबत रेशन दुकानदारांनी ऑनलाईन नावे विचारात घेण्याचा सल्ला दिला, पण, या विभागात अंजनगाव सुर्जी तालुक्यात ३५ हजारांवर केशरी रेशन कार्डधारक आहेत. सात हजारांवर बीपीएल आणि एक हजारांवर एपीएल कार्डधारक आहेत. ऑनलाईनच्या नोंदी नव्वद टक्के झाल्या असून, अजूनही १० टक्के नोंदी प्रलंबित आहेत. त्यामुळे रेशन विभागाची सर्व कामे ठप्प आहेत. या शंभर टक्के नोंदी ऑनलाईन करण्याची मोहीम शासनाने हाती घेतल्याची माहिती रेशन विभागाने दिली.
कोट
तक्रार प्राप्त झाली. चौकशी करण्यात येईल. त्या अनुषंगाने पुढे भाष्य करता येईल.
- वैशाख वाहुरवाघ, तहसीलदार, अंजनगाव सुर्जी
---