वाट पाहीन, पण एसटीनेच जाईन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 05:00 AM2020-08-22T05:00:00+5:302020-08-22T05:01:00+5:30

फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या अटीवर महामंडळाने बस रस्त्यावर उतरविल्या. गुरुवारी दिवसभरात नागपूर, यवतमाळ, अकोला, वर्धा, नांदेड, बुलढाणा, वाशिम, नागपूर ते औरंगाबाद, शेगाव आदी ठिकाणाहून परजिल्ह्यातील एसटी बस दाखल झाल्या, तर मध्यवर्ती बसस्थानकासह आठ आगारांमधून जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा ५७ फेऱ्या सोडण्यात आल्या. या माध्यमातून २ हजार ६४२ प्रवाशांची ने-आण एसटी बसफेऱ्यांमधून करण्यात आली.

I will wait, but I will go to ST! | वाट पाहीन, पण एसटीनेच जाईन!

वाट पाहीन, पण एसटीनेच जाईन!

Next
ठळक मुद्दे‘लालपरी’ला प्रतिसाद : २ हजार ६४२ जणांनी केला प्रवास, कोरोनाचे भय सरले

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर चार महिने बंद असणारी एसटी वाहतूक २० ऑगस्टपासून सुरू झाली. पहिल्या टप्प्यात जिल्हांतर्गत सुरू असणारी वाहतूक आता आंतरजिल्हा झाली आहे. पहिल्या दिवशी जिल्ह्यातील आठ आगारांमधून २ हजार ६४२ प्रवाशांनी प्रवास केला आहे. यामध्ये १ लाख ६७ हजार ६९८ रुपयांचे उत्पन्न मिळाले. तब्बल चार महिन्यांनी ‘लालपरी’ विविध जिल्ह्यांकडे गेली. चार महिने बसस्थानकांवर असणारा शुकशुकाट नाहीसा झाल्याचे चित्र शुक्रवारी सर्वत्र दिसून आले.
फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या अटीवर महामंडळाने बस रस्त्यावर उतरविल्या. गुरुवारी दिवसभरात नागपूर, यवतमाळ, अकोला, वर्धा, नांदेड, बुलढाणा, वाशिम, नागपूर ते औरंगाबाद, शेगाव आदी ठिकाणाहून परजिल्ह्यातील एसटी बस दाखल झाल्या, तर मध्यवर्ती बसस्थानकासह आठ आगारांमधून जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा ५७ फेऱ्या सोडण्यात आल्या. या माध्यमातून २ हजार ६४२ प्रवाशांची ने-आण एसटी बसफेऱ्यांमधून करण्यात आली.
कोरोनामुळे २३ मार्चपासून एसटीची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. मध्यवर्ती बसस्थानकासह जिल्ह्यातील आठ आगारांत गेले चार महिने प्रवाशांविना शुकशुकाट होता. या कालावधीत परप्रांतीयांना त्यांच्या गावी सोडण्यासाठीच केवळ काही बसेस सोडण्यात आल्या होत्या. २२ मेपासून जिल्हांतर्गत वाहतूक सुरू करण्यात आली आहे. आता २२ प्रवासी घेऊन बस धावू लागल्या आहेत.

महामंडळाच्या एसटी बसना प्रवाशांचा प्रतिसाद समाधानकारक आहे. यात दिवसेंदिवस वाढ होण्याची अपेक्षा आहे. प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन बस सोडण्यात येत आहेत.
- श्रीकांत गभणे
विभाग नियंत्रक

Web Title: I will wait, but I will go to ST!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.