धारणीत ‘आयएएस’ प्रकल्प अधिकारी
By Admin | Published: December 3, 2015 12:14 AM2015-12-03T00:14:11+5:302015-12-03T00:14:11+5:30
येथील आदिवासी विकास अप्पर आयुक्त कार्यालयातंर्गत येणाऱ्या धारणी येथील प्रकल्प अधिकारी (पीओ) पदाची सूत्रे शान मृगंज या नव्या आयएएसने बुधवारी स्वीकारली आहेत.
सूत्रे स्वीकारली : आदिवासी विकास कार्यालय
अमरावती : येथील आदिवासी विकास अप्पर आयुक्त कार्यालयातंर्गत येणाऱ्या धारणी येथील प्रकल्प अधिकारी (पीओ) पदाची सूत्रे शान मृगंज या नव्या आयएएसने बुधवारी स्वीकारली आहेत. मृगंज यांच्यावर आदिवासी समुदायाच्या विकासासाठी १२१.७३ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्याची जबाबदारी आहे.
राज्य शासनाच्या विभागात सर्वाधिक बजेट असलेल्या आदिवासी विकास विभागावर आदिवासी समुदायाचा विकास, शिक्षण, मूलभूत सोयीसुविधा, रोजगार आदी पायाभूत सुविधांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र, याच विभागात सर्वाधीक अपहार, भ्रष्टाचाराची प्रकरणे घडली आहेत. मेळघाटला कुपोषणाच्या गर्तेतून बाहेर काढण्याची कामगीरी नवे आयएएस शान मृगंज यांना उचलावी लागणार आहे. प्रशासकीय कामकाजाचा पाठीशी अनुभव फार नसला तरी प्रशिक्षणार्थी आयएएस असल्यामुळे आदिवासी समुदायाला न्याय देण्याची भूमिका त्यांना वठवावी लागणार आहे. मेळघाटात कुपोषणामुळे होणारे माता व बालमृत्यूचे प्रमाण रोखणे हे त्यांच्यापुढे आव्हान ठरणार आहे. मात्र मृगंज हे नवीन आयएएस असून तरी त्यांची पाटी कोरी आहे. त्यामुळे प्रशासनात कठोर निर्णय, समसूचकता ठेवून कामकाज केले तर काहीही अवघड नाही, हे वास्तव आहे. आदिवासी विकास विभागाला गालबोट लावणारे कोण? याचा शोध घेत नवख्या आयएएस मृगंज यांनी प्रशासकीय कामाची धुरा सांभाळली तर त्यांना अनेक बाबी सूकर होतील, असे चित्र आहे.
धारणी प्रकल्प अधिकारी कार्यालयातून कोट्यवधीचा निधी खर्च करतांना आदिवासींचा विकास आहे. मागासवर्गिय कल्याण योजना, यासह अनेक योजनांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)