१९ गुणवंतांना आदर्श शिक्षक पुरस्कार

By admin | Published: September 6, 2015 12:07 AM2015-09-06T00:07:36+5:302015-09-06T00:07:36+5:30

जिल्हा परिषदेमार्फत दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्काराने जिल्ह्यातील १९ शिक्षकांना शनिवारी जिल्हा परिषद शिक्षण विभागा तर्र्फे ...

Ideal Teacher Award for 19 Thousand Skill | १९ गुणवंतांना आदर्श शिक्षक पुरस्कार

१९ गुणवंतांना आदर्श शिक्षक पुरस्कार

Next

शिक्षक दिन : जिल्हा परिषदेत सन्मान
अमरावती : जिल्हा परिषदेमार्फत दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्काराने जिल्ह्यातील १९ शिक्षकांना शनिवारी जिल्हा परिषद शिक्षण विभागा तर्र्फे आदर्श शिक्षक पुरस्काराने मान्यवारांच्या हस्ते गौरविण्यात आले. यामध्ये सन २०१४-१५ यावर्षातील १३ प्राथमिक आणी १ माध्यमिक तर सन २०१५-१६ मध्ये ५ याप्रमाणे शिक्षकांचा समावेश आहे.यावेळी कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके, शिक्षण सभापती गिरीश कराळे,जिल्हा परिषद सदस्य बापुराव गायकवाड, मोहन पाटील, चंद्रपाल तुरकाने, विनोद डांगे, मंदा गवई, माजी पं.स. सभापती रंजनी बेलसरे, डेप्युटी सिईओ सुनील निकम, मुख्यलेखा वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक दादाराव तिवारी, शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे, सी.आर राठोड, उपशिक्षणाधिकारी पंडीत पंडागळे, जयश्री राऊत, कांबे, बोलके, प्रकाश बोरकर, किशोर पुरी आदी उपस्थित होते.
शैक्षणिक ज्ञानदानासोबतच सामाजिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या दोन्ही वर्षातील १८ प्राथमिक आणि एक माध्यमिक याप्रमाणे आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविले आहे.
यावेळी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक दादाराव तिवारी यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला आहे.यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष सतीश उईके,सभापती गिरीश कराळे, चंद्रपाल तुरकाने, यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)
हे आहेत सादर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी
जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी सन २०१५-१६ मधील पुरस्कारासाठी संदीप अकोलकर नांदगाव पेठ (अमरावती), देवकी भानुदास औगड शिंगणापूर (दर्यापूर), प्रशांत निमकर जसापूर (चांदूरबाजार), छाया विश्र्वनाथ काळे गोरेगाव (वरूड), गुलाम ताजोद्दीन शेख अ. गफ्फार (मांजरखेड कसबा) तर सन २०१४-१५ मधील विजया शंकर झाडे, गोविंदपूर (अमरावती), नंदा हरिदास ठाकरे, फुबगाव (नांदगाव खंडेश्र्वर), रवींद्र धरमठोक, शिंगणापूर (दर्यापूर), संजय भंडागे, सस्ती (चिखलदरा), युवराज मालखेडे, प्रिंपी थुगांव (चांदुर बाजार), प्रदीप खातदेव, टेबु्ररखेडा (वरूड), ज्ञानदेव गावंडे, मार्डी (तिवसा), नारायन अतकरे, धनोडी (चांदुर रेल्वे), सुरेश भुयार, सावंगी ( मोर्शी), अविनाश पाटनकर, चाकर्दा (धारणी़), मनोज मालखेडे, मुकींदपूर (अचलपूर), रामदास घोम, लखाड (अंजनगाव सुर्जी), योगीराज मोहोड, नारगावंडी (धामणगांव रेल्वे) आदी शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त करणाऱ्यामध्ये समावेश आहे.

Web Title: Ideal Teacher Award for 19 Thousand Skill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.