‘आयडिया’ने फोडली

By admin | Published: November 2, 2015 12:28 AM2015-11-02T00:28:50+5:302015-11-02T00:28:50+5:30

अचलपूर पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी ‘आयडिया’ कंपनीने आवंटन केबल टाकताना फोडल्याने दोन दिवसांपासून शहरातील पाणी पुरवठा खंडित झाला.

'Idia 'has broken | ‘आयडिया’ने फोडली

‘आयडिया’ने फोडली

Next

अचलपूर शहराची जलवाहिनी
तलाव साचले : दोन दिवसांपासून शहर तहानले

नरेंद्र जावरे परतवाडा
अचलपूर पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी ‘आयडिया’ कंपनीने आवंटन केबल टाकताना फोडल्याने दोन दिवसांपासून शहरातील पाणी पुरवठा खंडित झाला. दुसरीकडे लाखों लिटर पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने ठिकठिकाणी तलाव साचले आहेत. दरम्यान, कंपनीने काम करताना केलेल्या ड्रील मशिनमुळे थेट अचलपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिणीला छेद पडल्याने शुक्रवारपासून लाखो लिटर पाणी रस्त्यावरून वाहत आहे.
टँकरची मागणी
चंद्रभागा पाणीपुरवठा योजनेतून अचलपूर - परतवाडा या जुन्या शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र शुक्रवारपासून मुख्य जलवाहिनी ठिकठिकाणी फुटल्यामुळे अचलपूर शहरातील अनेक परिसरातील नळ कोरडेच राहिले. परिणामी नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. रविवारीसुद्धा शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा न झाल्याने अचलपूर नगरपालिकेच्या टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला.
सलग दोन दिवसांपासून अचलपूर शहराचा पाणीपुरवठा खंडित झाल्यामुळे नगरसेवकांवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला आहे. यावर प्रशानाने तातडीने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

दुल्हा गेट, मोबीनपुरा, कासदपुरा, माळीपुरा, बेगमपुरा, फरमानपुरा, हिरापुरा, अशरफपुरा, सुल्तानपुरा, विलायतपुरा, बियाबाणी आदी भागात पाण्यासाठी हाहाकार माजला आहे.
- कमरुनिस्सा मो. शब्बीर,
नगरसेविका.

अचलपूर शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने शहरात कमी दाबाचा पाणीपुरवठा सुरू आहे. जलवाहिनी जोडण्याचे काम सुरू आहे.
- धनंजय जावळीकर, मुख्याधिकारी, न.प. अचलपूर.

नालीतून केबल टाकण्याचे काम सुरू होते. त्यामुळे पाईपलाईन लिकेज झाली. पाईलाईन दुरुस्त करण्यात आली आहे. नालीचे काम बंद करण्यात आले
- अरुण यादव,
सुपरवाझर, आयडीआय कंपनी.

दोन दिवसांपासून अचलपूर शहरात पाण्याचा थेंबही नाही. तत्काळ टँकरने पाणीपुरवठा करावा. आयडीया कंपनीकडून दंड वसुली करावी.
- ऐहतेशाम नबी,
नगरसेवक, अचलपूर.

Web Title: 'Idia 'has broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.