बाळ वारंवार डायपर ओले करतेय, तातडीने डाॅक्टरांना दाखवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:11 AM2021-07-26T04:11:21+5:302021-07-26T04:11:21+5:30
अमरावती : लहान बाळ दिवसातून १० -१२ वेळा डायपर ओले करीत असेल तर ते नैसर्गिक आहे. परंतु, वारंवार डायपर ...
अमरावती : लहान बाळ दिवसातून १० -१२ वेळा डायपर ओले करीत असेल तर ते नैसर्गिक आहे. परंतु, वारंवार डायपर ओले करीत असल्यास ते टाईप १ मधुमेह इन्सुलिन आश्रित आजाराचे लक्षण मानले जाते. हे अल्पवयीन मुलांमध्ये आणि तिशीच्या आतील तरुणांमध्ये आढळतो.
बॉक्स
ही आहेत मधुमेहाची लक्षणे
•अचानक भुकेने तळमळणें (खायची तीव्र इच्छा)
•गरजेपेक्षा जास्तीवेळा लघवीला जायची गरज भासणे किंवा अगदी लहान बालकांमध्ये वारंवार डायपर ओले होणे.
•सतत तहानलेले असणे.
• परत होणारे संसर्ग, खास करून हिरड्यांना, कातडीला आणि मूत्राशयाला जखमांना आणि कापलेल्याला नेहमीपेक्षा अधिक वेळ बरे होण्यास लागत असल्यास हा आजार असू शकतो.
बॉक्स
आई-वडिलांना मधुमेह असेल तर...
आई-वडिलांना किंवा घरातील वृद्धांना मधुमेहाचा आजार असल्यास, आई किंवा वडिलांपैकी एकाला असल्यास आनुवंशिकतेने बाळाच्या शरीरातील साखरेचे प्रमाण कमी-अधिक होऊ शकते. त्यामुळे डॉक्टरांना दाखवून योग्य उपचार घेण्याचा सल्ला जिल्हा स्त्री रुग्णालयातील एसएनसीयू विभागाचे डॉ. बरडिया यांनी दिला.
कोट
नवजात बालकांमध्ये टाईप १ डायबिटीसचे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र, डायबिटीस असलेल्या मातांच्या नवजात बालकांमध्ये शुगर कमी होण्याची शक्यता असते. म्हणून अशा बालकांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवावे.
- डॉ. विजया जायदे,
एसएनसीयू विभाग,
जिल्हा स्त्री रुग्णालय, अमरावती